- * नेटबाल क्रीडा स्पर्धेसाठी मुला -मुलींचा अमरावतीचा संघ नागपूरला रवाना
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक नेटबाल क्रीडा स्पर्धा २०२२-२३ करिता नागपूर येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान महाराष्ट्र मिनी ओलीम्पिक नेटबाल क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी नागपूर येथे जाण्यासाठी गुरुवारी अमरावती मधून मुले आणि मुली रवाना झालेत . तदपूर्वी बुधवारी जिल्हा स्टेडियम येथे आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी भेट देऊन या सर्व खेळाडूंना मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल दर्जाची कामगिरी करण्यासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या. या दरम्यान नेटबाल क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या सर्व खेळाडूंचा अमरावती जिल्हा नेटबाल असोसिएशनचे सचिव-डॉ. सुनील कडू, तसेच सहसचिव व प्रशिक्षक – नितीन जाधव यांनी आमदार सौ.सुलभाताई खोडके यांना परिचय करून दिला.
यावेळी खेळाडूंनी आमदार महोदया यांचे स्वागत करीत त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करीत खेळाडूंनी कृतज्ञता व्यक्त करतांना आम्ही या स्पर्धेत वर्चस्व राखीत आपल्या अंगीभूत दर्जेदार क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करू. असा विश्वास यावेळी खेळाडूंनी व्यक्त केला.झुंजार खेळी व सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करीत आपल्या अमरावती विभागाचा नावलौकिक उंचावावा, तसेच आपण सर्व खेळाडूंनी विजयी लक्ष्य गाठीत विजयश्रीचे मानकरी म्हणून परता. असे प्रतिपादन करीत आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सदिच्छा व्यक्त करीत यावेळी खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांच्यासोबत मुक्त संवाद सुद्धा साधला. महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक नेटबाल क्रीडा स्पर्धा २०२२-२३ करिता मुलींमध्ये कर्णधार-खुशी चंदेल,उपकर्णधार-कांचन उभाड, या जवाबदारी सांभाळणार आहे. तसेच मुलींमधून गौरी राणे,वैष्णवी वानखडे,प्रीती पवार,स्वाती कांदळकर,नंदिनी बर्वे,दिव्या बोरकर, यामिनी अर्डक, प्राची काळे,सलोनी इंगोले,सोनल चव्हाण या १२ खेळाडूंची या स्पर्धेकरिता मुलींमधून निवड झाली आहे. तर मुलांमध्ये या स्पर्धेकरिता कर्णधार म्हणून शुभम सोनारे तर उपकर्णधार म्हणून अनुज तामटे हे जवाबदारी सांभाळत आहे.
यासोबतच मुलांमधून या स्पर्धेकरिता दीपक नेमाडे,अमन राजूरकर, कुणाल राजूरकर, सुमेरसिंग बिसेन, मोहित डोंगरे, आनंद शेंडे,ओम टेकाडे,सागर कुरळकर, भावेश रोंघे,या १२ खेळाडूंची निवड झाली आहे. या सर्वच खेळाडूंची निवड झाल्याबद्दल आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके समवेत यश खोडके, अमरावती जिल्हा नेटबाल असोसिएशनचे अध्यक्ष-प्रा. उदय ठाकरे, सचिव-डॉ. सुनील कडू, सहसचिव व प्रशिक्षक-नितीन जाधव,मुलींचे कोच मॅनेजर,शिवानी धाकडे,प्रा. सुगंध बंड, संदीप इंगोले आदिसहित क्रीडाप्रेमी व पालक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांचे प्रशिक्षक-नितीन जाधव यांनी आभार मानले.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–