- दु:खी संसाराला/सुखी तूच केले/
- अोझे तू वाहिले/रात्रंदिन//१//
- माय तूच बाप/मुलांची तू झाली/
- कष्टाची सावली/पांघरली//२//
- जीवन जगता/दु:खावर मात/
- शांत संकटात /रमा माता//३//
- केला तू संसार/गोवरया विकून/
- संघर्ष करुन/ जीवनात//४//
- उपाशी दिवस/रमाने काढले/
- शिक्षण शिकले/ परदेशी//५//
- बाबासाहेबांच्या/स्वप्नपूर्तीसाठी/
- पातळाला गाठी/ आयुष्यात//६//
- रमाई त्यागाने/बाबा मिळे स्फूर्ती/
- चोहिकडे कीर्ती/भीमराव//७//
- संकटाच्या वेळी /नाही घाबरली/
- जीवन जगली/कष्टमय//८//
- जीवनात त्याग/ रमाईने केला/
- जगी घडविला/शिल्पकार//९//
- रमाई मातेला /करितो नमन/
- करांनी वंदन / कोटी कोटी//१०//
–
- अभंगकर्ता:-
- प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर, अमरावती.
- भ्र.ध्व.-८०८७७४८६०९,
- Email Id :-arunbundele1@gmail.com