- * भारतीय महाविद्यालयात माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सलग्नित,भारतीय महाविद्यालय, अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारा माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जयंती कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, प्रमुख वक्ते डॉ. अलका गायकवाड, प्रमुख उपस्थिती प्रा. संगिता कुळकर्णी, डॉ. विजय भांगे व्यासपीठावर उपस्थित होते.सर्वप्रथम प्राचार्य डॉ. आराधना वैद्य यांच्या हस्ते माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हारर्पण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. अलका गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्राचा मंगल तिलक छत्रपती शिवरायांना घडविणारा जिजाऊ महान माता तर होत्याच,पण त्याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक देखणे पैलू होते. जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पहिले, व आपल्या जिवंतपणे ते शिवरायाकडून पूर्ण करून घेतले. अतिशय कणखर धाडसी जिजाऊंनी अनेक कृती मधून धार्मिक दहशतवादाला शह दिला. अंधश्रद्धाच्या निर्मूलनासाठी पहिले पाऊल उचलले, स्वराज्यासाठी शिवरायांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी स्वतः सती गेला नाही, पुढे स्वराज्य मधील कुणालाही सती जाऊ दिलं नाही, स्त्रियांकडे पाहण्याचा उदार दृष्टिकोन शिवरायांमध्ये निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. जिजाऊंचा इतिहास डोक्यावर घेऊन नाचण्याचा नाही, तर डोक्यात येऊन कृतीत आणावयाचा आहे. सोबतच स्वामी विवेकानंदांनी खऱ्या मानवधर्माची ओळख करून दिली. राष्ट्र प्रेमाचा आदर्श निर्माण केला नैतिक तारुण्याची शिकवण युवकांना करून दिली. त्यानुसार आचरण करून कृती करा असे आव्हान याप्रसंगी युवकांना केले.
या कार्यक्रमाला डॉ.सुमेध आहाटे, डॉ.नितिन तट्टे, डॉ.शेख,डॉ.संगीता देशमुख, डॉ.मंगला भाटे, डॉ. दया पांडे, प्रा. पंडित काळे, पंकज वैद्य, डॉ.वैशाली बिजवे, डॉ. राजेन्द्र तंतरपाडे, प्रा.लाभेश साबळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीता कांबळे आभार डॉ. प्रशांत विघे यांनी मानले.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–