महिलांचा आत्मसन्मान स्त्रियांनी घरकाम करायचे आणि पुरुषांनी कमावून आणायचे हीच आपल्या समाजाची मानसिकता होती. महिलांना शिक्षण घेता येत नव्हते पण आता परिस्थिती बदललेली आहे. स्त्री आपण उच्च शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायात पुढे जातायेत प्रत्येक क्षेत्रात स्त्री कुठेच कमी नाही, आणि त्यामुळे तिला आत्मसन्मान मिळायलाच हवा. आत्ता तर ती घरकाम करून कुटुंब सांभाळून नोकरी व्यवसाय करते तिला तिचा दर्जा आणि महत्त्व द्यायलाच हवे, स्त्रीला सुद्धा तिच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे तिला सन्मान मिळावा हे सुद्धा अपेक्षा असते नोकरी व्यतिरिक्त महिलांनी वेगवेगळ्या संस्थाद्वारे आणि स्वतःचे सुद्धा व्यवसाय सुरू केले आहेत. उदाहरणार्थ पोळी भाजी केंद्र टिफिन पाळणाघर उद्योग उपहारगृह बचत गट ब्युटी पार्लर बुटीक वगैरे वगैरे त्यामुळे संस्थेच्या कार्यामुळे आर्थिक उन्नतीमुळे असंख्य महिला स्वतःच्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
आर्थिक सबलीकरणामुळे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढला आहे महिला म्हणून एकमेकातील सहकार्याची भावना व सामंजसपणाही वाढला कुटुंबात एक प्रकारचे आर्थिक स्थैर्य निर्माण झालेले दिसून येते. प्रत्येक स्त्री करिअरच्या मागे लागलेली आपण बघतोच आणि त्यात तिची वाटचाल सतत सुरू असते. आपले कुटुंब किंवा आपण किती सुखी आहोत याचे चित्र बाहेरच्या जगात रंगवणे हाच खेळ बघायला मिळतो झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात ना अगदी तसेच म्हणजेच घरात कितीही वादविवाद असू देत पण बाहेर जायला नको. आणि नाते मात्र टिकून राहावे. चार लोक जमवून ठेवावेत हा स्त्रीचा स्वभाव असतो. गोडवाणी चांगली वागणूक आणि चांगले विचार हे तर आपल्या स्वतःच्या कंपनीचे जणू उत्पादन असते आपण जितका उच्च दर्जा राखू तेवढी उच्च किंमत मिळते त्यामुळे स्त्रीने किंवा महिलांनी स्वतःचा आत्मसन्मान स्वतःच मिळवायचा असतो कारण नुसतेच शरीर सुंदर असून चालत नाही शब्द आणि मन सुद्धा शुद्ध असायला हवेत. कारण माणसाची सवय असते तो चेहरा विसरू शकतो, पण शब्द आणि मन कधीच विसरत नसतो. कटू शब्द हे दुसऱ्याला बोलतात हे लक्षात ठेवावे दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल पण सन्मान देऊन आत्मसन्मान मिळवताय आला पाहिजे.
महिलांना सन्मान हा मिळायलाच हवा त्यांच्या कामाची कष्टाची कदर व्हायला हवी अपेक्षा गैर गैरसमज अहंकार आणि तुलना त्यामुळे एकमेकातील नातेवेगळायला नकोत त्यासाठी झाले गेले विसरून जावे, आणि माफ करावे याच तत्वाचा वापर करणे केव्हाही चांगले असते. आपल्या आयुष्यात चांगल्या व्यक्तींना माणसांना महत्त्व आणि योग्य स्थान द्यावे. ते हृदयातील ठोक्यासारखे असते ते कधीच दिसत नसते पण त्यांची स्पंदने त्यांचे अस्तित्व आपल्याला सदैव जाणवत असते. जीवनात अशी माणसे कायम जपावेत त्याचबरोबर स्त्रीने स्वतःचा आत्मसन्मान सुद्धा जपावा माणसं पारखायला शिकावे कुणासाठीही वेळ नसेल इतकं व्यस्त होऊ नये आणि कोणीही गृहीत धरावा इतका स्वस्त पण होऊ नये म्हणतात ना बोट दिले तर मनगट पकडतात अगदी तसेच असते बघा जरा चांगले वागले की टेकन फोर ब्रँडेड समजतात त्यामुळे आपली पायरी ओळखून स्त्रीने वागावे सत्य बोलल्याने जर वाद होत असेल किंवा काम करण्याची कदर होत नसेल तेव्हा समजावे की लबाड आणि निष्क्रिय लोकांनी परिस्थिती आपल्या ताब्यात घेतली आहे.
समाजहितासाठी आणि स्वतःच्या आत्म सन्मानासाठी प्रवाह विरुद्ध जिद्दीने कसोटीने प्रयत्न करावे रडत किंवा हात जोडत बसू नये कारण रडण्याने आत्मविश्वास नष्ट होतो प्रयत्न करत राहिल्याने आत्मविश्वास वाढतो त्यासोबतच आत्मसन्माला आला आपोआपच वाट मिळते त्याचप्रमाणे मौन आणि हास्य या दोन्हीचा जीवनात नेहमी उपयोग करावा, कारण मोहन म्हणजे आपले रक्षा कवच आणि हास्य स्वागताचे द्वार आहे स्त्री किंवा माणूस म्हणजेच व्यक्तीमध्ये काही कमतरता असेल किंवा एखाद्या गोष्टीत कच्चा असेल तर काही हरकत नसते फक्त माणुसकीमध्ये पक्का असायला पाहिजे कारण कुठल्याही पदापेक्षा त्याचे गुणवत्ता महत्त्वाचे असते तीच आपल्या ला आत्म सन्मानापर्यंत पोहोचवते कारण इतरांसाठी पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश दिवा पेटवणाऱ्या वरही पोहोचतोच त्यालाही उजेड मिळतं त्यामुळे इतरांसोबत त्याचाही चेहरा नक्कीच उजळतो हे तितकेच सत्य आहे.
त्यामुळे ती व्यक्ती आपोआपच प्रकाशमान होते हे अटळ सत्य आहे श्रेष्ठत्व किंवा आत्मसन्मान हा जन्माने मिळत नसतो तर तो आपल्याला कर्म कला आणि आचरणाने प्राप्त होतं ज्याप्रमाणे लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळत नाही त्याचप्रमाणे हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाची माने जुळत नाहीत आयुष्यात सर्व काही मिळते पण समाधान मिळत नसते जेव्हा आयुष्य संपत जाते तेव्हा माणसाच्या मनात येते की अरे हे तर आपल्याच जवळ आहे आपण उगाच बाहेर शोधतो आहे. त्याचप्रमाणे महिलांचा आत्मसन्मान हा देखील प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे ते त्रिकाल सत्य आहे तो कसा मिळवता येईल किंवा मिळवावा आणि तोही योग्य रीतीने योग्य सन्मानाने आणि प्रामाणिकपणे मिळवावा याच सन्मानात आत्मा आपुलकी प्रेम या तिन्ही गोष्टी जोडलेल्या असतात त्याच आत्मसन्मानाचे मुकुट महिलांना प्राप्त व्हायला हवे. महिलांचा आत्मसन्मान कुटुंबाचा मुकुट असतो त्याग संघर्ष कला भावनांचा आणि कष्टांचा सरताज असतो.
हर्षा वाघमारे
नागपूर
9923818752
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–