- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “स्वराज्य महोत्सव” निमित्त बुधवार दिनांक १७ ऑगस्ट,२०२२ रोजी “समूह राष्ट्रगीत” कार्यक्रम महानगरपालिका प्रांगणात सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, उपायुक्त डॉ.सिमा नैताम, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या” पार्श्वभूमीवर शहरात “स्वराज्य महोत्सवाचे” आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या प्रांगणात अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेच्या सर्व शाळा, झोन कार्यालय तसेच शहरातील विविध भागात राष्ट्रगीताचे समूह गायन करण्यात आले.
य“स्वराज्य महोत्सव” निमित्त महानगरपालिका प्रांगणात देशभक्तीपर गीत सादरीकरण करण्यात आले.यावेळी महानगरपालिका मराठी माध्यमिक मुलांची शाळा वडरपुरा येथील विद्यार्थ्यांच्या बँन्ड पथकाने यावेळी राष्ट्रगीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन.बी. सोनवणे सर व विजय खंडारे सर यांनी केले.