- * मौजा म्हसला सर्व्हे नं.२२/भाग येथील ९६ सदनिका दिनांक ०५/०७/२०२२ पासुन ताबा देणे सुरु
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक ५ जुलै,२०२२ रोजी प्रधानमंत्री आवास योजने बाबत बैठक महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपआयुक्त सुरेश पाटील, सहाय्यक संचालक नगर रचना आशिष उईके, शहर अभियंता रविंद्र पवार, तांत्रिक सल्लागार जिवन सदार, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता सुनिल चौधरी, गजानन जाधव, विपिन त्रिवेदी, अंकीत सावळे उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेची सविस्तर चर्चा व माहिती जाणून घेतली.
अमरावती महानगरपालिका हद्दीत प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र.३ (खाजगी भागीदारी द्वारे परवडणा-या घरांची निर्मिती करणे) अंतर्गत ८६० सदनिका बांधकाम वेगवेगळ्या भुखंडावर प्रस्तावित असून मौजा म्हसला सर्व्हे नं.२१/फ येथील ६० सदनिका लाभार्थ्यांना मार्च,२०२१ मध्ये हस्तांतरीत करण्यात आल्यात. आज दिनांक ०५/०७/२०२२ रोजी म्हसला सर्व्हे नं.२२ येथील ९६ सदनिकेचा ताबा लाभार्थ्यांना देण्याची प्रक्रीया सुरु करणेचे आदेश मा.आयुक्त यांनी प्रधानमंत्री आवास योजना विभागास दिलेत. पुढील १ महिन्यामध्ये मौजा बडनेरा सर्व्हे नं.१०/३ व निंभोरा सर्व्हे नं.५५ येथील ९४ सदनिका लाभार्थ्यांना वितरीत होतील. त्याचप्रमाणे आढावा दरम्यान घटक क्र.४ (BLC) अंतर्गत मंजूर घरे ८०३६ व पी.आर.कार्ड वितरण बाबतचा आढावा घेण्यात आला.