- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : स्थानिक वऱ्हाड विकास येथे फुले -शाहू -आंबेडकरी अनुयायांची खास सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतीपर्व निमित्त विचार विनिमय करण्यात आला.
उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड, कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे, मातंग समाज नेते श्री.उत्तमराव भैसने, कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण बुंदेले, दलित मित्र सौ. शालिनी मांडवधरे ,श्री संत रविदास बहुउद्देशीय संस्थेचे इंजि. सुधाकर हिरुळकर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे क्रांती परिषदेचे ईश्वरदास गायकवाड, डॉ. आंबेडकर दलित मित्र समाजभूषण संघाचे प्रकाश खंडारे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले हे सत्यशोधक समाजाचे व बालहत्याप्रतिबंधक गृहाचे संस्थापक, कृतिशील समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, जनतेकडून महात्मा पदवी प्राप्त झालेले सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. त्यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, अखंड या परिवर्तनवादी ग्रंथातून बहुजन समाजात क्रांती घडवून आणली.अशा या समाज क्रांतिकारक महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनी दि.२८ नोव्हेंबर ला महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करून शासकीय व निमशासकीय कार्यालय व शाळा-महाविद्यालयात अभिवादनाचे आयोजन करण्याची मागणी केली.
फुले-शाहू-आंबेडकरांचे अनुयायी व समता सैनिक पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला महात्मा फुले पूर्णाकृती पुतळा परिसर स्वच्छ करून आदरांजली अर्पण करतील.बैठकीला पुरोगामी विचारांच्या संघटनांचे सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–