- * जिल्हा दंडाधिका-यांकडून आदेश जारी
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया बडनेरा रस्त्यावरील नेमाणी गोडाऊनमध्ये दि. दोन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजतापासून सुरू होईल. मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी मतमोजणी परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला.
आदेशानुसार, उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येऊ नये, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देऊ नये. त्याचप्रमाणे, मतमोजणीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स मशीन, ई-मेल, इतर संपर्कसाधनांचा गैरवापर प्रतिबंध करण्यात येत आहे, तसेच मतमोजणी ठिकाणाच्या 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, कॅल्क्यूलेटर आदी प्रकारच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
याबाबत मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रसिध्दी करुन जाहीर व ठळक लावण्याचे, तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसिध्दी देण्याचे आदेश आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.
हा आदेश मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजतापासून मतमोजणीची प्रक्रिया लागू करण्यात आला आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–
● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!