- * अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक
- * पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज
- * 340 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची जबादारी महत्त्वपूर्ण असून सर्व प्रक्रिया दक्षतापूर्वक पार पाडावी यासाठी त्यांचे व्दितीय टप्प्यातील प्रशिक्षण नियोजन भवन येथे आज पूर्ण झाले.
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणूक 2023 कार्यप्रणालीबाबत प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांनाचे 85 चमू तयार करण्यात आले आहेत. त्यातील 10 चमू राखीव ठेवण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये 340 अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत. या सर्वांना व्दितीय टप्प्यातील प्रशिक्षण प्रशिक्षक सहायक आयुक्त (भूसुधार) शामकांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मोर्शी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, चांदुर रेल्वे उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, रोहयो उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिनारे, पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धायगुडे, दर्यापूर तहसीलदार योगेश देशमुख, तिवसा तहसीलदार वैभव फरताडे, तहसीलदार उमेश खोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये मतदानाच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया पावरपॉईंट प्रात्यक्षिकेव्दारे सादर करण्यात आले. यामध्ये निवडणूकीच्या संदर्भातील वैधानिक तरतूदी, केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची कर्तव्ये, मतदार यादी व मतपत्रिकेची तपासणी, मतदार केंद्र उभारणी, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात करावयाची कार्यवाही, जम्बो मतपेटी तयार करणे, अंध किंवा दिव्यांग मतदाराकडून मतदान करताना घ्यावयाची दक्षता, ओळखीबाबत आक्षेप, मतदानानंतर मतपेट्या सुयोग्य पध्दतीने सीलबंद करणे, निवडणूक सामग्री आदींबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रात्यक्षिकेव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.
मतपेट्या उघडणे, बंद करणे, सीलबंद करणे, कागदी सील, पोस्टल बॅलेट, मतपत्रिका व मतदान यादीची तपासणी याबाबत प्रात्यक्षिकेव्दारे माहिती देण्यात आली.
मतदान सोमवार, दिनांक 30 जानेवारीला सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील निवडणूकीचे संपूर्ण साहित्य गोळा झाल्यानंतर तात्काळ विशेष सुरक्षा व्यवस्थेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरक्षेत सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणी गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतपत्रिकेच्या तपशीलावर सविस्तर माहिती देण्यात आली. मतदार यादी, मतदाराचा अनुक्रमांक याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरसन करण्यात आले.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–
● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!