- * हिवरखेड जिल्हा परिषद सर्कलमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन लोकार्पण !
- * हिवरखेड सर्कलमधील नागरिकांनी मानले देवेंद्र भुयार यांचे आभार !
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये पांदण रस्ते, सिमेंट रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांची अनेक कामे आमदार देवेंद्र भुयार यांनी हाती घेतली आहेत. पायाभूत सुविधांची दर्जेदार निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जात असून, त्यामुळे दळणवळण वाढून विकासाला गती मिळणार आहे असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आज केले.
ग्रामीण भागात विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक विकास कामांना गती देण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने ही कामे गतीने पूर्ण करावी, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे मोर्शी तालुक्यातील लाखरा येथे २५१५ अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे ७ लाख रुपये, उमरखेड येथे २५१५ अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे ७ लक्ष रुपये, उमरखेड येथील प्रकाशराव पुरोहित ते नारायणराव भोजने यांच्या शेतापर्यंत १ किमी पांदण रस्ता खडीकरण करणे, डोंगर यावली येथे Mregs अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे १० लक्ष रुपये, 2515 अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम ७ लक्ष रुपये, डोंगर यावली येथील हनुमान मंदिर ते श्रावनजी गावंडे यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, श्याम जवंजाळ ते पाणी पुरवठा विहीर पर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, डोंगर यावली ते किशोर राऊत यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, डोंगर यावली येथील राजेशजी पेठे ते घोगरा नाला यांच्या पर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, दापोरी रोड ते सुखदेव काळे यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, डोंगर यावली येथील शरद कटोलकर ते विद्या कोंडे यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, घोडदेव येथे २५१५ अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम 7 लक्ष रुपये, बेलोणा येथे २५१५ अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे ७ लक्ष रुपये, बेलोणा ते सुरवाडी पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, बेलोणा ते गोरेगाव पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये.
प्रमोद सारस्कर ते सुरवाडी पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, हिवरखेड येथील परिहार ते शेख यांच्या शेतापर्यंत पर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, हिवरखेड येथील मोहनराव तोटे ते विनायकराव गहूकर यांच्या शेतापर्यंत पर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, हिवरखेड येथील श्यामभाऊ ढोमने ते रमेशराव ढोमने यांच्या शेतापर्यंत पर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, हिवरखेड येथील सुधीर धरमकर ते नंदुभाऊ दुर्गे यांच्या शेतापर्यंत पर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, हिवरखेड ते डोरली पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी. २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, हिवरखेड ते दापोरी पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी. २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, हिवरखेड येथील मारोतराव काळे ते बंडूभाऊ पाटील यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, मौजा हिवरखेड ते बेलोणा पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, गणेशराव गुडधे ते दामोदराराव वानखडे यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता खडीकरण करणे १ किमी २३ लक्ष ३३ हजार ३८१ रुपये, mrgegs अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे १० लक्ष रुपये, २५१५ अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे १७ लक्ष रुपये, ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत csc सेंटर बांधकाम करणे ४ लक्ष रुपये, नवोदय विद्यालय येथे डिजिटल क्लासरूम, कॉम्पुटर प्रोजेक्टर ४ लक्ष २० हजार रुपये, महात्मा फुले विद्यालय येथे डिजिटल क्लासरूम, कॉम्पुटर प्रोजेक्टर ४ लक्ष २० हजार रुपये, जिल्हा परिषद शाळा येथे डिजिटल क्लासरूम २ लक्ष ५० हजार रुपयांचे विकासकामे मंजूर करून हिवरखेड जिल्हा परिषद सर्कलमधील लाखारा, उमरखेड, घोडदेव, डोंगर यावली बेलोणा, हिवरखेड येथील सर्व विकासकामांचे भूमिपूजन लोकार्पण संपन्न झाले.
त्यावेळी आमदार देवेंद्र भुयार, माजी जिल्हा परिषद सभापती श्रीपाद ढोमने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष रुपेश वाळके, सरपंच विजय पाचारे, सरपंच भाग्यश्री केचे, माजी पंचयात समिती सदस्य अनिल अमृते, शयम ढोमने, यांच्यासह लाखारा, उमरखेड, घोडदेव, डोंगर यावली बेलोणा, हिवरखेड येथील सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होती.