- झोपडी झाली उध्वस्त
- ढगफुटी कशी आली..
- कमावलेली सारी कवडी
- मातीने क्षणात गिळली..
- मातीमोल झाले श्रम
- नाही किंमत ही त्याला ..
- चिंधी बांधुन पोटाला
- उरी महापुर आला..
- दैना जीवाची ही झाली
- लेकरे उपाशी झोपली..
- हाक ऐक रे देवा आता
- येतील का कामी नाती आपली..
- डोळ्यांतले अश्रू त्याचे
- अन आठवत होते श्रम..
- नव्हती पायी वहान जेव्हा
- शिरी लोटले पुन्हा रीण..
- पयपय जोडुन जेव्हा
- सुखाची झोपडी साकारली..
- क्षणाच्या त्या धारांनी
- आसवांची नदी वाहीली..
- कशाची ही शिक्षा
- सांग बा रे पांडुरंगा…
- कुठे जाणार गरीब
- अश्रू नयनी ती गंगा..
- प्रतिक्षा गजानन मांडवकर
- (स्वप्न डोळ्यातले)
- पिंपळगाव यवतमाळ
- 8308684865