- * ‘एसएओ’ यांचे कृषी सेवा केंद्रधारकांना आवाहन
अमरावती, : जुने ई- परवाना संकेतस्थळ बंद झाल्याने जिल्ह्यातील सर्व बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेते व कृषी सेवा केंद्रधारक यांनी त्यांचे परवाने आपले सरकार या पोर्टलअंतर्गत नव्या प्रणालीवर कार्यरत करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.
नव्या प्रणालीत भरावयाची माहिती व प्रक्रियेबाबत गत महिन्यात कृषी केंद्र संचालकांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. त्यामुळे सर्व केंद्रधारकांनी बियाणे, खत परवाना व कीटकनाशके परवान्यांच्या नव्या प्रणालीतील नोंदी जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करून घ्याव्यात, असे आवाहन श्री. खर्चान यांनी केले.
- * सर्वात प्रथम माहिती अद्ययावत करणा-या विक्रेत्याचा सत्कार
जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील व-हा येथील जनाई कृषी सेवा केंद्राचे संचालक रितेश आगरकर यांनी नव्या प्रणालीवर जिल्ह्यात सर्वात प्रथम आपले परवाने नोंदवून कार्यान्वित केले. त्यामुळे त्यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. खर्चान यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व नविन प्रणालीवरील परवाना देऊन गौरविण्यात आले.
- (Images Credit : Sakal)