गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना सुचित करण्यात येते की, जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदणी करून मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी अमरावती येथे जिल्हा कामगार सुविधा केंद्र सुरू केले आहे.
तसेच या बाबतीत www.mahabocw.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्जासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क न साधता मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनाचे लाभाचे अर्ज भरावेत, ज्याव्दारे त्यांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनाचे लाभ घेता येईल, असे आवाहन मंडळ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
मागील वर्षभरात 90 दिवस किंवा अधिक दिवस बांधकाम ठिकाणी काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, (टी.सी., पॅन कार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना) पासपोर्ट आकारातील फोटो, आधारमधील माहितीच्या वापरासंबंधात संमती पत्र, स्वयंघोषणा प्रत, बँक पासबुकाची छायाप्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.