- * मित्र-परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत समाजविज्ञान शाखेतील आचार्य पदवी जाहीर झाली आहे. प्रा. प्रवीण वानखडे हे स्थानिक श्याम नगर येथील तक्षशिला महाविद्यालयातील इतिहास विभागाचे विभागप्रमुख आहे. त्यांनी ‘पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत शैक्षणिक संस्थांचे ऐतिहासिक कार्य’ या विषयावर संशोधन कार्य केले आहे. त्यांना या विषयाच्या संशोधन कार्यासाठी शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती इतिहास विभागात कार्यरत प्रा. डॉ. नलिनी टेम्भेकर यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. प्रवीण वानखडे यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आई हिरुताई, वडील नाजुकराव वानखडे, जावई अनिल इंगळे, मार्गदर्शक प्रा. डॉ. नलिनी टेम्भेकर परिवारातील भाऊ, बहीण याना दिले आहे. ‘पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत शैक्षणिक संस्थांचे ऐतिहासिक कार्य’ या विषयाच्या यशस्वी संशोधनासाठी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष आई डॉ. कमलताई गवई, विद्यमान अध्यक्ष कीर्ती राजेश अर्जुन, सचिव प्रा. पी.आर.एस. राव, तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लू पडवाल, महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक व मित्रपरिवारांनी शुभेच्छा दिल्या आहे.