- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाला सर्व सोयींनी युक्त अमरावती महानगरपालिका क्षेत्रात भाडेतत्वावर जागा मिळण्याबाबत शोध सुरू आहे. इच्छूक इमारतधारकांनी संपर्क साधण्याचे आवाहन पर्यटन उपसंचालक विवेक घोडके यांनी केले आहे.
इमारतीचे बांधकाम अंदाजे दीड ते 2 हजार चौ. फुट चटईक्षेत्र असावे. इमारतीच्या बांधकामाला 40 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेला नसावा. इमारतीमध्ये स्वतंत्र इलेक्ट्रिक मीटरसह वीजपुरवठा असणे आवश्यक आहे. मुबलक पाणी पुरवठा बारा महिने असावा. (बोअरवेल, विहिर, प्राधिकरणाचे नळ इत्यादी पैकी कोणतेही एक). शासकीय वाहनाकरिता पार्किंगसाठी जागा असावी. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निश्चित होणाऱ्या रकमेनुसार भाडे अदा केले जाईल. या बाबींची पुर्तता होत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ असणाऱ्या इमारतीस प्राधान्य देण्यात येईल.
इच्छूकांनी दि. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बरॅक क्र. 3 मध्ये स्थित पर्यटन कार्यालयात दरपत्रक सादर करावे. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 0721 – 2990457 व ई-पत्ता ddtourism.ami-mh@gov.in, तसेच ddami.agro@gmail.com हा आहे.