- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्हयात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये राबविण्याबाबत दिनांक ०१ जुलै २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार ही योजना खरीप २०२२ व रब्बी २०२२-२३ हंगामाकरिता कब आणि कॅप मॉडेल (80:110) नुसार राज्यात राबविण्यात येत आहे.
योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकयांना विमा संरक्षण देणे. शेतकऱ्यांना नाविण्यपुर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सातत्य राखणे. खरीप हंगामात समाविष्ट पिके :- भात, ज्वारी, मका, तुर, मुग, उडीद, सोयाबिन, कापूस, राज्यात खरीप हंगाम 2022 मध्ये योजना खाली नमुद केलेल्या विमा कंपनीकडुन संबंधित जिल्हा समुहामध्ये राबविण्या येणार आहे.
समाविष्ट जिल्हे बुलढाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ नियुक्त केलेली विमा कंपनी भारतीय कृषि विमा कंपनी, पत्ता – मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-400023 ई-मेल – pikvima@aicofindia.com टोल फ्री क्रमांक 18004195004 आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पत्ता- माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लाट नं. 246, सी विंग, बंडगार्डन, पुणे- 411001 ई-मेल customersupportba@icicilombard.com टोल फ्री क्रमांक – 18001037712 विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता- योजने अंतर्गत राज्यात सन 2022-23 साठी सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पिक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या पिक कर्ज दराप्रमाणे पिक निहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली असून जिल्हानिहाय पिकनिहाय विमा हप्ता रुपये प्रति हेक्टरी खालीलप्रमाणे आहे.
जिल्हा बुलढाणा भात- ज्वारी 642.50 सोयाबीन 1110.00 मुग 516.34 उडीद 520.50 तुर 736.04 कापूस 2999.15 मका 711.96 अकोला भात- ज्वारी 600.00 सोयाबीन 1082.00 मुग 456.00 उडीद 456.00 तुर 736.04 कापूस 2580.00 वाशिम ज्वारी 600.00 सोयाबीन 1080.00 मुग 456.00 उडीद 456.00 तुर 736.00 कापुस 2580.00 अमरावती भात 880.00 ज्वारी 580.00 सोयाबीन 1060.00 मुग 440.00 उडीद 440.00 तुर 736.04 कापुस 2750.00 यवतमाळ ज्वारी 570.80 सोयाबीन 924.20 मुग 509.00 उडीद 509.00 तुर 736.04 कापुस 2310.00
- योजनेचे वैशिष्टये :
प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.50 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. या योजने अंतर्गत खरीप सन 2022 व रब्बी हंगाम सन 2022-23 या एक वर्षाकरीता जोखिमस्तर सर्व अधिसुचित पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
या वर्षी काही पिकांमध्ये महसुल मंडळामधील पिकांचे सरासरी उतपादन नोंदवितांना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनास 10 टक्के भारांकन आणि पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास 90 टक्के भारांकन देवुन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. ई-पिक पाहणी शेतक-यांनी लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पिक पाहणीमध्ये करावी. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेलं पिक अंतीम गृहीत धरण्यात येईल.