Skip to contentलोटांगण घेत आलेत पायाजवळ..
इहवादाची इमारत अजून तरी ..!
शोधताहेत नवसाला बळी जाणारे बकरे ..
जोतिरावाचे अखंड पुरस्कर्ते
जन्मत नसतात बळी जाण्यासाठी..
जगण्याचे संदर्भ बदलले तरी
इतिहास लुप्त होत नाही डोळ्यापुढून …
जगणं सुसह्य होत असतं, म्हणतात..
नाचता येतं दोन्ही हात वर करून…
पुढच्या पिढीच्या भवितव्याला..
पिढ्यानुपिढ्याच्या आजारावर
पुन्हा एखादं प्रभावी औषध …!
पुन्हा एखादा परफेक्ट डॉक्टर
आधीपासूनच तर खत्रे मे जान…!’
बसलो आहे फुले-शाहू-आंबेडकरांनी उभारलेल्याआरामदायी मंडपात
बघतो आहे शोषकांचे बनावट चेहरे
हरेक कोनातून सूर्य सरकत जाताना
जिथे समरसतेच्या रेशमी शालीत
बांधल्या जाते अभिव्यक्तीचं गाठोडं..
केला जातोय मेंदू गुळगुळीत
अकाली उठणाऱ्या बेमौसमी वाऱ्यांनो..!
त्यांच्या अमानुष संस्कृतीच्या कानात–
मेंदू रिटायर झाला नाही माझा..!’
Post Views: 39
Like this:
Like Loading...