- एक पणती माझ्या हाती
- एक पणती तुझ्या हाती
- चला उजळूया रे आपण
- दिन दुबळ्यांच्या रे राती !!
- उंच उंच चढवू या
- दिवा, कंदिल आकाशी
- लावू बन्धुत्वाची ज्योत
- वैर नकोच कुणाशी !!
- पणती पेटऊ हृदयी
- देशप्रेम एकतेची
- ईमानाचे तेल घालू
- लावू वात समतेची !!
- एक पनती पेटऊ
- माझ्या रे बळीराजाची
- सुख समृद्धि येऊ दे
- घड़ी येऊ दे आनंदाची !!
- घरोघरी पेटवावी
- ज्योत वीर शहीदांची
- ज्योतिस ज्योत मिळू द्या
- वाट मिळो रे मुक्तिची !!
- सारा प्रकाश प्रकाश
- चंद्र तारे माझे दारी
- नाश होओ तिमिराचा
- सुख नांदो घरोघरी !!
- वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- अकोला 9923488556