- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : श्री ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती, राष्ट्रीय सेवा योजना व नेहरु युवा केंद्र, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिवस व माँ जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
श्री ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक धोटे, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, प्रा. सुरज हेरे, अनिकेत वझे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. डॉ. दीपक धोटे यांनी स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ यांचे विचार आत्मसात करुन तसे वागण्याचे प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले. स्नेहल बासुतकर यांनी युवा दिवसाचे महत्त्व व माँ जिजाऊ यांच्या कार्याची माहिती दिली. प्रा. सुरज हेरे यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडले. अनिकेत वझे यांनी माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीमती भुंबर यांनी केले. प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच नेहरु युवा केंद्राचे अधिकारी व युवक यावेळी उपस्थित होते.
- राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स व नेहरु युवा केंद्रामार्फत युवा दिन साजरा
राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स व नेहरु युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला. मुख्य अतिर्थी लेफ्टनंट कर्नल एम.के. सिंग उपस्थित होते. नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यावेळी उपस्थित होत्या.लेफ्टनंट कर्नल एम.के. सिंग यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सुबोध धुरंदर यांनी स्वामी विवेकानंद व त्यांचे विचार तसेच राष्ट्रीय युवा दिवसाविषयी माहिती दिली. राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–