नर्सिंग आणि मिडवायफरी हा रोजगाराची उत्तम संधीमिळवून देणारा अभ्यासक्रम असल्याने इच्छुकाने त्याचा विचार करायला हवा. आजकाल मोठय़ा शहरातील संघटित क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये परिचारिका आणि परिचारकांना आकर्षक वेतनाच्या नोकर्या मिळत आहेत. या पदांवर काम करण्यासाठी परदेशी जाता यावं या हेतूनेही या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला जातो. प्रवेश घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये महिला नर्स असतात. पण पुरुषांनासुद्धा या क्षेत्रात चांगली संधी आहे.
आणखी एक बाब म्हणजे नर्सिंगच्या क्षेत्रात केवळ हॉस्पिलटमध्येच संधी आहेत असं नाही तर अनाथार्शम, वृध्दार्शम, सॅनटोरियम, उद्योग तसंच लष्करातही नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण करणार्यांना उत्तम कारकिर्द करता येते. नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्यांसाठी मेडिकल टुरिझमचं क्षेत्रही महत्त्वाचं ठरतं. आपल्याकडे भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग, पुणे इथे या संदर्भातील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. रूग्णांची वाढती संख्या तसंच रूग्णालयांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता नर्सिंगच्या क्षेत्रात व्यापक संधी उपलब्ध होत आहेत.