जगात अनेक प्रकारच्या चांगल्या आणि वाईटही सवयी असलेल्या अनेक प्रवृत्ती असतात… काही नमुन्यांना विकृत आणि विध्वंसक कामं करण्यातच आनंद मिळत असतो… काही जन्माला आल्यापासूनच हुशार असतात, तर काही मरेपर्यंत बधिरच राहतात… बधिरांना सुधरवणारे डॉक्टर शेवटी शेवटी येडे झालेत…
हुशारांमध्येही काही तर इतके हुशार असतात, की लोकांच्या पंचायती करण्यातच त्यांना फार मोठेपणा वाटत असतो, आणि त्यातच त्यांच आयुष्य ते खपवत असतात… अगदी नवीन माणसांशी सुद्धा ओळख झाली तरी ते अतिशहाणे पूर्णपणे त्याच्या घरा-दारा सहित पंचायती करायची हायगयच करीत नसतात… बरं अशा सवयींमुळे यांना गावात, मित्रात किंवा नातेवाईकातही कुत्रं कोणी विचारत नसतच…
जन्माला आल्या नंतर बऱ्यापैकी बोलणं शिकण्यासाठी चार-पाच वर्ष सहज निघून जातात, पण काय बोलायचं, कुठे बोलायचं, किती बोलायचं, कोणाबद्दल बोलायचं, आणि त्याची खरंच गरज आहे का, याचा विचार करायची अक्कल मात्र यांना मरेपर्यंत येत नसतेच… वेळप्रसंगी लोकांचे घोडे लावून घेतील, मार खातील, पण ते स्वतःला बदलून घ्यायला तयारच नसतात… मला यावरून अगदी काल-परवाच एका पत्रकार मित्राने सांगितलेला मुद्दाआठवला… बरेच वेळा समोरच्या घटनेची आणि परिस्थितीची आपल्याला पूर्ण माहिती नसते, आणि मग समोरची घटना पाहून आम्ही आपले अंदाज व्यक्त करीत असतो…
समजा एखाद्या माणसानं समोरच्या दुबळ्या व्यक्तीवर हात उचलला आणि त्याला भर रस्त्यात यथेच्छ बदकायला सुरुवात केली असेल, तर आपला रोष हमखास मारणाराच्या बाबतीतच तयार होत असतो… मार खाणारां बद्दलच आपल्याला नेहमी सहानुभूती वाटत असते… परंतु घटनेची खरी माहिती समोर आल्यानंतर आम्हाला कळलं ते सत्य वेगळंच असतं… ज्याला आम्ही दुबळा समजत होतो, ते फार खोडीचं निघालं… त्यानं अनेक वेळा या मारणाराच्या खोडी काढलेल्या असतात, आणि बरेच वेळा त्याला तोंडी समज देऊनही त्याच्यात सुधारणा होत नसतेच… म्हणून त्याला एखाद दिवशी हाताखालून काढायलाच लागतं… तोंडी परीक्षेपेक्षा लेखी परीक्षेचा परिणाम जरा बरा येईल, असे मारणाराला वाटत असते… परंतु फटके खाल्ल्यानंतरही तो सुधरेल याची अजिबात शाश्वती नाहीच… तो फक्त चार दिवस शांत राहिलेला दिसू शकतो, पण मारणाराचा बदला घेण्याचे डावपेच त्याच्या मनात सतत चालूच असतात.. अशा वेळेला आपल्याकडून जर काही होत नसेल, तर मग त्याचा बदला घेण्यासाठी तो समोरून एखादी पार्टी तयार करीत असतो… मग त्यांच्या दोघांची लावून देईल आणि पुन्हा गंमत पाहायला उभा राहील…
या माणसांकडे फक्त दुसऱ्यांची निंदा करणे, दुसऱ्यांचे सात-बारा काढणे आणि कोणाचीही नावं कोणाशीही जोडून देणे, यातच यांचा हातखंडा असतो… अशा प्रवृत्तींच कधीच कोणाशी पटत नसतं… बरं आपल्याला माणसं का टाळतात याबद्दलची जराशीही खंत या लोकांना वाटत नसतेच… बालवयात माणसं खोडकर असतातच, पण काहींची म्हसणात गौऱ्या जायची वेळ आलेली असते, तरी ते खोडी सोडायला तयारच नसतात… अशा प्रवृत्तींना शेजारी-पाजारी, गावकरी, भावबंध आणि नातलगच नाही तर स्वतःच्या घरातलेही पूर्णपणे वैतागलेलेच असतात… पण याबाबतीत त्यांच्याकडे काहीच चिंतन नसते, आणी त्याबद्दलची त्यांना लाजही नसतेच… आणि ते सुधारण्याचा कधी प्रयत्नही करीत नसतात…
- ‘जब जिंदगी खत्म हुई,
- तो जीने का ढंग आया…
- और शमा बुझने के बाद,
- महेफिल मे रंग आया…!’
वास्तविक पाहता दुसऱ्यांच्या दुःखांवर हसणे, दुसऱ्यांच्या खोडी काढणे म्हणजे आपल्या दुःखांना आमंत्रण देणे, असाच त्याचा हिशोब असतो… आपण जर दुसऱ्यांना सुख समाधान देऊ शकत नसलो, तर किमान दुसऱ्यांना वेदना, दुःखं देण्याचे तरी कामं माणसाने आयुष्यात करू नये, हीच खऱ्या अर्थाने अशा प्रवृत्तींना भावपूर्ण श्रद्धांजली…
- -भाऊ थोरात,
- शिर्डी
- ७३५०७११०५२
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–