- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावतीच्या धर्मादाय सहायक आयुक्त कार्यालयात दाखल होणाऱ्या संस्था, न्यास नोंदणी अर्ज व बदल अर्ज या सेवा ऑनलाईन स्वरुपात दाखल करण्यात याव्या. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मार्गदर्शन प्रक्रिया www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रणाली मार्गदर्शन या टॅबमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 0721-2663308 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त संभाजी ठाकरे यांनी केले आहे.
धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालये पारदर्शक व गतिमान होण्यासाठी ऑनलाईन दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत संबंधितांनी नोंद घेण्याबाबत धर्मादाय सह आयुक्त कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–
- (छाया : संग्रहित)