नवी दिल्ली : भारतात येत्या सहा ते आठ आठवड्यात कोरोना विषाणू संक्रमणाची तिसरी लाट देशात दाखल होऊ शकते. ही तिसरी लाट रोखणे अशक्य असल्याचे मत ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलंय.
कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय चुकीचा म्हणता येणार नाही, कारण यामुळे जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो, असेही मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलंय. आत्तापयर्ंत देशातील ५ टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. या वर्षीच्या शेवटपयर्ंत देशातील १0८ कोटी लोकसंख्येचे लसीकरण करणे, हे सरकारचे लक्ष्य आहे आणि हे एक मोठे आव्हान आहे.
कोरोना संक्रमणाच्या दुसर्या लाटेत मार्च महिन्याच्या शेवटी सुरू झालेले लॉकडाऊनचा सिलसिला देशभरात आता कुठे हळूहळू कमी होताना दिसतोय. त्यातच तज्ज्ञांकडून तिसर्या कोरोना संक्रमणाच्या लाटेच्या शक्यतेवर सावधानतेचा इशारा दिला जातोय.
देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे, कोविड नियमांसंबंधी ढिलाई दिसून येत आहे. आपण कोविडच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेतून काहीही धडा घेतल्याचे सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत नाही. पुन्हा एकदा गर्दी दिसून येतेय. अनेक लोक एकत्र येत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या सहा ते आठ आठवड्यात कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. किंवा त्यापेक्षा थोडा अधिकही वेळ लागू शकतो. कोविड नियम आपण कशा पद्धतीने हाताळतो आणि गर्दीपासून वाचण्याचा कसा प्रयत्न करतो, त्यावर हे अवलंबून आहे, असेही गुलेरिया यांनी म्हटलेय.
रॉयटर्सच्या एका सर्व्हेनुसार, देशात ऑक्टोबर महिन्यापयर्ंत कोरोनाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. या सर्व्हेत जगभारतील ४0 तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, विषाणूशास्त्रज्ञ, एपिडेमिओलॉजिस्ट आणि प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला होता. जास्तीत जास्त लोकांना लसीकरणात सहभागी करून कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते, असे मतही या तज्ज्ञांनी व्यक्त केलेय. दुसर्या लाटेच्या तुलनेत तिसर्या लाटेत संक्रमणाची संख्या कमी असू शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलीय.
Related Stories
December 2, 2023