अचलपुर : अचलपूर परतवाडा मार्गावर दी. १0 जुन ला सकाळी दहा दरम्यान एका भरधाव दुचाकी व ऑटो चालकाचा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अपघात झाला आहे. यात ऑटो व दुचाकींचे मोठे नुकसान झाले .सदर दुचाकी चालक हा फुलचंद आठवले वय २८ रा. धोत्रा धाना, बैतुल , मध्यप्रदेश हा आपल्या अचलपूरातील देवळी येथील रस्ता नुतनीकरणाच्या कामात मजुरी करीता परतवाड्यात आलेला होता . कामावर जात असताना विरुद्ध दिशेने येणारा ऑटो क्रमांक एम एच सत्तावीस बी. डब्लू २४२९ हा शेतामधून गहू घेऊन माल विकण्याकरिता जात होता .याची व दुचाकीची अचलपूर मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर जोरदार धडक झाली . धडक एवढी गंभीर होती की अपघातात ऑटोचा पुढील भाग चक्काचूर झाला तर दुचाकीचा अक्षरश: पुढील भाग हॅन्डल पासून तुटून दुसरीकडे जाऊन पडले. सदर परिसरात अपघातामुळे मोठा आवाज झाला त्यामुळे अपघाताच्या दिशेने नागरिकांनी ताबडतोब धाव घेत अपघातग्रस्तांना बाजूला असणार्या खाजगी रूग्णालयात दाखल केले मात्र तेथून ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले . तेथे डॉक्टर क्टरांनी त्यावर उपचार केला मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अचलपूर परतवाडा मार्गावर हल्लीच्या दिवसांमध्ये मोठा भरधाव पध्दतीने ऑटो दुचाकी चारचाकी ये जा करतात . सदर मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठी इस्पितळे असल्याने सकाळपासूनच या मार्गावर मोठी वर्दळ असते. तर हॉस्पिटलच्या आजूबाजूचा परिसर हा रुग्णांच्या नातेवाईकांच्या वाहनांमुळे व्यापलेला असतो. त्यातच दुचाकी ऑटो चारचाकी व इतर वाहने भरधाव पध्दतीने याच मागार्तून वाहतूक करत असतात. त्यामुळे बरेचदा इथे छोटे मोठे अपघात होतात याकडे आता प्रशासनाने लक्ष घालून या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची नितांत गरज आहे .
Contents
hide
Related Stories
November 11, 2024
November 11, 2024