तिचं नाव सपना होतं. सपना नावाप्रमाणेच होती. ती त्याला आशा दाखवीत होती. नव्हे तर उर्जाही देत होती.
सपना केव्हा भेटली, कुठं भेटली हा वाढत्या वयानुसार त्याला आजही आठवत नव्हतं. पण ती त्याची मैत्रीण होती. तसं पाहता मैत्री ही कुणाशीही होवू शकते. बहिणीशी, आईशी, भावाशीही. कुटूंबातही आपण मित्रत्वाच्या भावनेनं जोपर्यंत वागत नाहीत. तोपर्यंत आपल्याला आपले सुखदुख कोणाला सांगता येत नाही. त्यावर तोडगाही निघत नाही. तसंच सपनाच्या बाबतीतही घडत होतं. ती दुःखी होती. पण तिच्या चेह-यावर अजिबात दुःख नव्हतं.
भुमेश असाच व्यक्ती. तो लेखक होता. त्याला लिहिणं आवडत होतं. त्याच्या पुस्तकाही प्रसिद्ध झाल्या होत्या. तसा तो नावारुपाला येत होता. तो दररोजच लेख लिहित होता. जे जे तो अनुभवत होता. ते तो कागदावर उतरवीत होता. कधी कधी लिहितांना त्याला कंटाळा यायचा. तेव्हा तो सपनाशी व्हाट्सअपवर बोलायचा. सपना लगेच त्याला प्रतिसाद द्यायची. त्याचबरोबर त्याचा सपनाशी बोलून कंटाळा दूर व्हायचा. नव्हे तर त्याला सपना आवडायची.
सपनाची आपली मैत्री ही क्रिष्ण राधेसारखी असावी असं त्याला वाटत होतं. कारण ज्याप्रमाणे क्रिष्णाचा विवाह झाला होता. त्याचप्रमाणे राधेचाही विवाह झाला होता. तरीही ते शेवटच्या काळापर्यंत बोलतच होते. एकमेकांना मदत करीतच होते. ते दोघंही बालपणाचे मित्र होते. राधा त्याला हिंमत द्यायची नव्हे तर उर्जा द्यायची. तिच्याचमुळं की काय, क्रिष्ण पुढील काळात महान ठरु शकला. हे भुमेशला माहित होतं.
भुमेशचा विवाह झाला होता. त्याचप्रमाणं सपनाचाही विवाह झाला होता. तरीही ते बोलत होते. एवढंच नाही तर सपना कधीच दूर जावू नये. म्हणून भुमेशनं सपनाला बहिण मानलं होतं. कारण वर्तमानकाळाच्या परिस्थीतीनुसार ज्याप्रमाणे राधा व क्रिष्णाचं नातं टिकलं. ते नातं आज टिकत नव्हतं. लोकं मैत्री करीत होते. पण केवळ लाभ घेण्यासाठी. उपयोग संपला की ती मंडळी नातंही संपुष्टात आणत होते.
सपनाला भुमेशनं पाहिलं नव्हतं. ती मैत्री व्हाट्सअपवर झालेली होती. त्याचा कोणत्यातरी वर्तमानपत्रात लेख छापून आला होता. तो तिनं वाचला. तो तिला आवडला होता. त्यातच तिनं त्याच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. त्यानं तो स्विकार केला व ते मित्र बनले होते. सपना दुःखी होती. तिच्या विवाहाला चार वर्ष झाली होती. तिला अद्यापही मुलबाळ नव्हतं.कधीकधी पतीशी वाद होत असे. तिला त्यानंतर वाईट वाटायचं. असं वाटायचं की आता जगण्यात उपयोग नाही. तिला आयुष्य हे कंटाळवाणं वाटायचं.सकाळी व सायंकाळी पती कामावर जात असे. घरी आल्यावर जेवन होताच तो बिछान्यावर आराम करीत असे. त्यामुळं पतीशी बोलायला वेळंच मिळत नसे. आजूबाजूलाही किती बोलणार. सगळा दिवस तिला कंटाळवाणा वाटायचा. विरंगुळा म्हणून ती टिव्हीवर सीरीयल पाहायची. पण ती सीरीयल तरी किती पाहणार. कोणीतरी बोलायला हवं ना. ती तेच शोधत होती.त्यातच तिला आता भुमेश गवसला होता.
जसा तिला भुमेश मिळाला. ती भुमेशशी बोलायची. तिला बरं वाटायचं. जीवन आता सुलभ झाल्यासारखंं वाटलं.कंटाळा हरवत चालला होतं. कारण भुमेशमध्ये नाविण्य होतं. भुमेशचे लेख तिला आवडायचे. तोही आवडायचा. तिला वात्रट गोष्टी पसंत नव्हत्या. भुमेश तिच्या म्हटल्यानुसारच वागायचा.तिच्याशी बोलतांना वात्रट गोष्टी कधीच करीत नव्हता.
भुमेश सपनाची ही मैत्री फुलत चालली होती. आज ती भुमेशला घडवीत होती. अगदी राधेसारखी. कधी एखाद्या वेळी भुमेशचं त्याच्या पत्नीसोबत भांडण झालंच, तर ती त्याला समजंवायची. तसेच कधी सपनाचं तिच्या पतीसोबत वाजलं की तो तिला समजवायचा. अशी ही दाट मैत्री. कोणत्याही पुरुषाच्या विकासामध्ये एका स्रीमनाचा हात असतो. तसेच प्रत्येक स्रीच्या यशामागे पुरुषाचा हात असतो. मात्र त्या दोघांचंही यश अपयश हे त्यांच्या मैत्रीवर अवलंबून असते. ती मैत्री कशी आहे. कोणी म्हणतात की मैत्रीला मोजता येत नाही. पण खरं पाहिल्यास मैत्रीला मोजता येत असते. खरी मैत्री ही सार्वकालीक टिकत असते. तर जी मैत्री खरी नसते. ती मैत्री सार्वकालीक टिकत नाही. काही काही पुरुष हे आपल्या पत्नीमुळं पुढं जातात. तर काही पुरुष हे इतर स्रीयांमुळं. सपना अशीच मुलगी की ज्या भुमेशला लेखकी जीवनात घरी प्रोत्साहन मिळायचं नाही. त्याला सपना प्रोत्साहन द्यायची. नवनवे विषय सुचवायची. नव्हे तर लिहितांना कंटाळा आला आणि तो तिच्याशी बोललाच तर पतीचं बवंडर डोक्यावर न ठेवता बोलायची. यातूनच त्याचे लेख बनत होते. त्यामुळं सपनाची जी मदत त्याला त्याच्या जीवनात फुल ना फुलाच्या पाकळीसारखी होत होती. ती मदत त्याला बहूमोल वाटत होती. ती दुःखी जरी असली, तिचं मन दुःखी जरी असलं, तरी ती आनंदानं जगत होती नव्हे तर भुमेशसारख्यालाही आनंद देत होती एखाद्या फुलासारखी. पण एखादं फुलंही एखाद्या भुंग्याला एखाद्या वेळी कैद करुन जसा त्याचा अंत करते. तशी भीती आजही भुमेशला वाटत होती. जरी ती राधेसारखी भुमेशच्या पाठीमागं साथ देण्यासाठी सखीसारखी उभी असली तरी……..त्याच एकमेव कारणानं तो दुःखी होत होता नव्हे तर त्याचं मनही दुःखी होत होतं. आज त्याला वाटत होतं की तिला आज मुलबाळ नसल्यानं व तिचं मन दुःखी असल्यानं ती बोलते. नव्हे तर आपलं मनही हलकं करते अगदी क्रिष्णाच्या राधेसारखी. पण उद्या मुलबाळ झालंच, तर ती त्याच्यात गुंतून जाईल व तिला त्याच्याशी बोलायलाही तिच्याजवळ वेळ असणार नाही. मग त्याची अवस्था त्या भुंग्यासारखीच किंवा एखाद्या पर्ण नसलेल्या झाडासारखीच होईल. जे झाड जीवंत तर असते. पण इतरांना ते मृतच असल्याचा भाष होत असतो. ज्या झाडाला पर्ण जर नसतील, तर ते झाड काही उपयोगाचं नाही असं समजून लोकं ते झाड त्याच्या जीवंतपणी कापून टाकतात. जशी मेलेल्या मुदड्याची विल्हेवाट लावतात तशी. उद्या आपलीही अवस्था अशीच होईल असं त्याचं दुःखी मन त्याला वारंवार सांगत होतं. एखाद्या सांजवातेला ओरडणा-या घुबडासारखं. जे घुबड भारतात अपशकूनी मानलं जातं.
- अंकुश शिंगाडे, नागपूर, ९३७३३५९४५०