अमरावती :नुकतेच डॅा.गोविंद कासट मित्रमंडळीतील मुख्याध्यापक दिलीप सदार यांचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांसह व मित्रमंडळीतिल अनेक थोरामोठ्यांच्या उपस्थितीत भारतीय अंधजन विकास व पुनर्वसन संस्थेच्या नवीन कार्यालयात शैक्षणिक साहित्य प्रदान करुन साजरा करण्यात आला.
डॉ.गोविंद कासट मित्र मंडळीतील सक्रिय सदस्य मुख्याध्यापक दिलीप सदार हे मित्र मंडळीच्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या हजेरी लावून मित्रमंडळींच्या वृत्तपत्ररद्दी संकलनाच्या कामात सर्वतोपरी सहकार्य मित्र मंडळीस करतात. मागील अनेक वर्षांपासून ते आपला वाढदिवस मित्रमंडळी सोबत एखाद्या सामाजिक उपक्रमाने अगदी साध्या पद्धतीने साजरा करतात. या वर्षीही त्यांनी आपला वाढदिवस आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत भारतीय अंधजन विकास व पुनर्वसन संस्थेच्या कार्यालयात त्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करून साजरा केला. शैक्षणिक साहित्याचा स्वीकार संस्थेचे शाकीर नायक यांनी केला.
यावेळी दिलीप सदार यांचेसोबत यांच्या मातोश्री विमलताई सदार, मोठेबाबा चिलाजी तायडे, पत्नी जान्हवी सदार, मुले रिदम व रूहान,मेघा सदार, सिया सदार, स्वरा काळबांडे, अमर इंगळे तर मित्र मंडळीच्या प्रभाताई आवारे, प्रा. संजय शिरभाते, सुभाष गाव पांडे, शाकीर नायक, प्राचार्य डॉ.सुभाष गवई, उमेश वैद्य, लक्ष्मण तडस, सुरेश कस्तुरकर, नंदकिशोर पेठकर, भीमराव कडू, विवेक सहस्त्रबुद्धे, भावना पसारकर, जीवन गोरे, विष्णुपंत कांबे, विकास साकळे, डॉ. रामगोपाल तापडिया, चंद्रशेखर वानखडे, देवानंद गणोरकर इत्यादी मंडळी प्रामुख्याने हजर होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद उपेंद्र गुडदेकर यांचे वडील धनंजय गुडदेकर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष गावपांडे यांनी तर आभार प्रदर्शन शाकीर नायक यांनी केले. तर स्व .दौलतभाई देसाई मतिमंद मुलांची शाळा चे मुख्याध्यापक जीवन गोरे यांनी आपल्या सुंदर आवाजात वाढदिवसाचे गाणे म्हणून सर्वांची वाहवा मिळवली.