- सन १९२० पासून लालदासबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात !
- २८ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन !
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील दापोरी येथे श्री संत लालदासबाबा संस्थानच्या वतीने श्री संत लालदासबाबा यांचा १०२ वा पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दापोरी येथे २८ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्शी तालुक्यातील दापोरी या गावाला श्री संत लालदासबाबा यांनी आपली कर्मभूमी निवडून विशेष कार्य केले. त्यामुळे दापोरी या गावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
श्री संत गजानन महाराज यांच्या समकालीन कालखंडात दापोरी येथे प्रगट झालेले श्री संत लालदास बाबा यांचा १०२ वा भव्य पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात दापोरी नगरीत संपन्न होत आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले लालदासबाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा कारण्याकरिता दापोरी नागरीमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथून व परिसरातील पंचक्रोशीतील लाखो भाविक सहभागी होत असून चैत्र शुद्ध चतुर्थीला लालदासबाबा यांच्या समाधीचा अभिषेक तिर्थस्थापना करून या सप्ताहाची सुरुवात केल्या जाते. फाल्गुन कृष्ण द्वादशी पासून सुरु होणाऱ्या श्री संत लालदासबाबा पुण्यतिथी महोत्सवात संगीतमय सदृश्यमय श्रीमद भागवत सप्ताह, काकडा आरती, हरिपाठ, सत्संग, अखंड विना वादन, कीर्तन, आरती, भजन, अवधुती भजन, यासह विविध कार्यक्रम व नवनवीन स्पर्धांचे उपक्रम राबविले जातात. दापोरी नगरीमध्ये श्री संत लालदासबाबा यांच्या बद्दल श्रद्धेची भावना असून या पावन भूमीत पुण्यतिथी महोत्सवाला येणाऱ्या भक्तांची प्रचंड वर्दळ राहणार आहे.
दापोरी येथे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत लालदास बाबा यांचा १०२ वा भव्य पुण्यतिथि महोत्सव दापोरी नगरीमध्ये सालाबादाप्रमाने यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असून या महोत्सवा निमित्य संगीतमय सदृश्यमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह ह भ प श्री मुकुंद महाराज धोटे भागवताचार्य यांच्या मधुर वानीतून संपन्न होणार आहे.
श्री संत लालदासबाबा पुण्यतिथी माहोत्सवा निमित्य दापोरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दापोरी नगरी मधे आनंदाचे व उत्साहचे वातावरण असून या ठिकाणी विवध धार्मिक कार्यक्रम बाराही महिने सुरु राहतात या भगवत सप्ताहाला रोज हजारो भक्त उपस्थित राहणार आहे. दापोरी येथे ५ एप्रिल रोजी श्री संत लालदास बाबा यांच्या पालखिचि भव्य शोभायात्रा मिरवणूक निघणार असून या पुण्यतिथि महोत्सवाला लाखो भक्तांचा जनसागर उसळणार आहे. श्री संत लालदास बाबा यांच्या भव्य पुण्यतिथी महोत्सवात मोठ्या संखेणे उपस्थित राहून समाधी स्थळाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत लालदास बाबा संस्थान चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी मंडळ, व दापोरी येथील समस्त गावकारी मंडळी यांनी केले आहे.
दापोरी येथील संत लालदासबाबा देवस्थान र नं ए १८४३ ता मोर्शी जी अमरावती यांच्या समाधी स्थळाला शासनाचा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र व पर्यटन दर्जा मिळाला झाला असून लाखो भक्तांच्या सहकार्यातून या समाधी स्थळाच्या वृक्षाचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे. कोरोना आपत्तीमुळे देश संकटात असतांना कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्य सरकारने सढळ हाताने आर्थिक मदत करावं असं आवाहन केलं होत. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत दापोरी येथील श्री संत लालदासबाबा संस्थान तर्फे मुख्यमंत्री सहायता निधी करिता ५१ हजार रुपये आर्थिक मदत देऊन श्री संत लालदासबाबांच्या सेवाकार्याच्या विचारांची नाळ कायम ठेऊन लालदासबाबा संस्थानाने कोरोनाविरोधातील लढ्यात खारीचा वाटा उचलला आहे.