* पत्रकारिता व जनसंवाद विभागात विद्यार्थ्यांनी व्यक्त केले विचार
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद विभागात आचार्य बाळशास्त्री जांभेकर याना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर. संस्थेचे आधारस्तंभ स्मृतिशेष रा. सू. गवई याना पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी विभागप्रमुख प्रा. विलास फरकाडे, प्रा. अमित त्रिवेदी, प्रा. राजरत्न मोटघरे यांची उपस्थिती होती.
प्रा. अमित त्रिवेदी यांनी मराठी पत्रकारीतेत दर्पण वृत्तपत्राचे महत्व व त्यामागील भूमिका स्पष्ट केली. प्रा. मोटघरे यांनी वर्तमानपत्रानी आज मोठमोठया क्रांती घडविल्या आहे. फ्रेंच राज्यक्रांती, भारताचे स्वातंत्रसंग्राम, अमेरिकेचा स्वातंत्रलढा हे त्याचे उदाहरण असल्याचे सांगितले. यावेळी बादल वैद्य, अंकुश सहारे, कीर्ती इंदूरकर, प्रथमेश इंगळे, ललिता अखंडे या विद्यार्थ्यांनी पत्रकारिता शिकत असतांना आपला अनुभव व्यक्त केला.
भविष्यातील भावी पत्रकारांना संस्थेच्या मार्गदर्शक आई डॉ. कमलताई, संस्थाध्यक्ष कीर्ती राजेश अर्जुन, सचिव प्रा. पी.आर.एस. राव, प्राचार्य डॉ. अंजनकुमार सहाय यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बादल वैद्य, अंकुश सहारे, कीर्ती इंदूरकर, जयकुमार पुनसे, विक्की बाभुळकर, प्रथमेश इंगळे, ललिता अखंडे अमिता बेठेकर, संघर्ष लौकरे, शुभम रौराळे, निखिल गवई, पियुष धुळे, विजयपाल तायडे, आचल विलास ढोणे, गौरव मोटघरे, वैभव अवतिक, साहिल तायडे, अभिजित नांदणे, आतिष कच्छवे, सुजल लांजेवार या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–