जोपासा बागकामाची आवड

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

कामाच्या धबडग्यात आपण आपल्यातील अनेक क्षमता नजरेआड करत असतो. आपले अनेक छंद दुर्लक्षित राहतात. पण ते आवर्जून जपायला हवेत. आता हेच बघा.. अनेकंना बागकामाची आवड असते मात्र, वेळेअभावी ती बाजूला सारावी लागते. तुम्हीही अशाच निसर्गप्रेमींपैकी एक असाल तर बागेचा जेरिस्केपिंग मार्ग अवलंबा.
बागकामाचा हा अनोखा मार्ग अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात तुमच्या अंगणात, टेरेसमध्ये अथवा बाल्कनीत हिरवा शेजार फुलवू शकतो. गार्डनिंगच्या या पर्यायात मातीऐवजी भुसा, वाळलेलं गवत, भाज्यांचे देठ, फळांच्या साली आदींचा वापर केला जातो. हा पूर्णपणे नैसर्गिक रसायनांवर आधारित पर्याय असल्यामुळे कोणतंही रासायनिक खत घालावं लागत नाही. खत म्हणून सुकलेली पानं अथवा बारीक कापलेलं गवतही वापरता येतं. जेरिस्केपिंग गार्डनिंगद्वारे लावलेल्या रोपांना आलेली फुलं लवकर कोमेजत नाहीत. अशा प्रकारे लावलेल्या रोपांना वारंवार पाणी घालण्याचीही आवश्यकता नसते. अत्यंत कमी पाण्यात त्यांची चांगली वाढ होते, सहाजिकच निगराणीचा खर्च वाचतो.

Leave a comment