- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, तसेच राज्य प्राधिकरणाच्या निर्देशान्वये जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून त्यात दाखल व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहेत.
लोकअदालतीत अर्ज करणा-यांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. पक्षकारांनी आपले तडजोडप्राप्त प्रलंबित खटले राष्ट्रीय लोकअदालतीसमक्ष तडजोडीने व समंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा, तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालयाकडे संपर्क साधावा. पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन राष्ट्रीय लोकअदालतीसमक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. पाटकर तसेच सचिव जी.आर. पाटील यांनी केले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–