- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत उत्कृष्ट संकल्पना मांडणाऱ्या नवउद्योजकांना आकर्षक बक्षीसे व राज्यस्तरावर सहभाग मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवउद्योजकांनी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.
स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याहस्ते विभागात यात्रेचा शुभारंभ झाला. जिल्ह्यात आज दर्यापूर व भातकुली तालुक्यात यात्रेचे आयोजन करण्यात आले. अमरावती व चांदूर रेल्वे तालुक्यात उद्या (20 ऑगस्ट) यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदगाव खंडेश्वर व धारणी तसेच चिखलदरा येथे दि. 22 ऑगस्ट रोजी, अचलपूर व अंजनगाव सुर्जी येथे दि. 23 ऑगस्ट रोजी, चांदूर बाजार व मोर्शी येथे दि. 24 ऑगस्ट रोजी, वरुड येथे दि. 25 ऑगस्ट रोजी, तिवसा येथे दि. 27 ऑगस्ट रोजी, धामणगाव रेल्वे येथे तसेच दि.29 ऑगस्ट रोजी येथे आयोजित करण्यात आली आहे.
राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवसंकल्पना तसेच सुरुवातीचे टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवणे तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यता पूर्ण परिसंस्था बळकट करणे हा उद्देश आहे.
अभियांनातर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये लोकसमूह एकत्रित होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक वाहन, यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नाविन्यपूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देईल. नाविन्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना यावेळी नोंदवू शकतात.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा-प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व तज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्यांना 25 हजार रुपयापर्यंतचे पारितोषिक मिळणार आहे.
राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांचे घोषणा प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम 10 कल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण तज्ज्ञ समिती समोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना 1 लाख रुपयापर्यंतचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरवण्यात येतील. अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in वर भेट द्यावी.
अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक नवउद्योजकांनी आणि महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पवनीत कौर, जिल्हाधिकारी अमरावती व प्रफुल शेळके सहाय्यक आयुक्त यांनी आवाहन केले आहे. काही अडचणी किंवा शंका अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा कौशलय विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा या कार्यालयाचे वैभव तेटू. मो.क्र. 7020958231, प्रविण बांबोळे मो. क्र. 9130419585, पंकज कचरे मो.क्र. 8605654025 यांच्याशी तसेच कार्यालयाचा दुरुध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा.