- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिका-यांनी परस्पर समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिली.
निवडणूकीसाठी नियुक्त नोडल अधिका-यांच्या कामकाजाचा महसूलभवनात आढावा घेताना त्या बोलत होत्या. अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी मनीषकुमार गायकवाड, रणजीत भोसले, सुभाष दळवी, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख, सहायक नगर प्रशासन आयुक्त गीता वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, तहसीलदार उमेश खोडके आदी उपस्थित होते.
मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण करावी. मतदान केंद्र व्यवस्थापन कक्ष, वेबकास्टिंग, दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक तिथे व्हीलचेअर, रॅम्प, कोविड प्रतिबंधक नियमावलीनुसार सॅनिटायझर आदी सर्व व्यवस्था ठेवावी. त्याबाबत वेळोवेळी खातरजमा करावी. कुठेही काही अडचण येत असल्यास तत्काळ निदर्शनास आणून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी यावेळी दिले.
टपाली मतपत्रिका, आदर्श आचारसंहिता कक्ष, एक खिडकी कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, वाहतूक नियोजन आदी विविध कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–