- * जिल्ह्यातील तीन नद्यांचे होणार पुनरूज्जीवन
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खोलाड, पिंगळाई, चंद्रभागा या तीन नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याचे उद्दिष्ट असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाचा प्रारंभ जिल्ह्यात झाला. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते वरखेड येथे पिंगळाई नदीचे जलपूजन करण्यात आले.
यानिमित्त नद्यांची परिक्रमा यात्रेचाही प्रारंभ झाला. उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, चंद्रभागा नदी समन्वयक अरविंद नळकांडे, पिंगळाई नदी समन्वयक गजानन काळे, राजीव अंबापुरे आदी उपस्थित होते. नदी संवाद यात्रा दि. १२ ते २३ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.
गेल्या काही वर्षात कधी अनावृष्टी व कधी अतिवृष्टी असे पर्जन्यमान होत आहे. पूर आणि दुष्काळासारख्या समस्या उद्भवत आहेत. वाढते नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. प्रदूषणामुळे भूजलाची उपयुक्तता घटत आहे. गाळामुळे नद्यांची वहन व साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे नद्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे चंद्रभागा नदी अभियानाचे समन्वयक श्री. नळकांडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक होऊन जिल्हास्तरीय समिती यापूर्वीच गठित करण्यात आली आहे. नोडल अधिकारी आणि समन्वयकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. चंद्रभागा नदीसाठी श्री. नळकांडे यांची समन्वयक म्हणून आणि चिखलदरा, अचलपूर व दर्यापूरच्या उपविभागीय अधिका-यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खोलाड नदीसाठी नदी समन्वयक श्री. अंबापुरे व नोडल अधिकारी चांदूर रेल्वेचे एसडीओ, तसेच पिंगळाई नदीसाठी समन्वयक श्री. काळे व नोडल अधिकारी तिवसा एसडीओ आहेत.
अभियानात नदी संवाद यात्रा, नदीसाक्षरता वाढविणे, नदीचा तट, प्रवाह, जैवविविधतेबाबत जागृती, नदी खो-यांचे नकाशे, पूररेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पूर व दुष्काळ, अतिक्रमण, शोषण, प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे आदी कामे करण्यात येणार आहेत, असे श्री. नळकांडे यांनी सांगितले.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–