अमरावती : सामजिक चळवळीत सतत अग्रेसर असणारे चंपतराव अर्जुनजी पाईकराव यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्प आजाराने राहत्या घरी दिग्रस येथे दि ५/९/२०२१ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले संजय, विजय, स्नुषा, तीन मुली, जावाई, नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे. मनमिळाऊ स्वभाव, सामजिक बांधिलकी जोपासणारे चंपतराव अर्जुनजी पाईकराव यांच्या निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Contents
hide
त्यांचे पार्थिवावर मोक्षधाम दिग्रस येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. मुळचे वाई मेंढी येथील रहिवासी असलेले चंपतराव अर्जुनजी पाईकराव हे जिल्हा परिषदे अंतर्गत ड्रेसर म्हणून सेवानिवृत्त झाले होते.