गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकतेच ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र आयोजित तिसरे राज्यस्तरीय युगस्री. फातिमाबी शेख मुस्लीम मराठी साहित्य संमेलन दिनांक १२-०१-२०२५ रविवारी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथे सुप्रसिद्ध साहित्यिक कवयित्री मलेका महेबुब शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
उद्घाटन प्रसिद्ध विचारवंत मा.प्राचार्य नागोराव कुंभार यांनी वृक्षाला जलदान देवून केले.या संमेलनात प्रमुख पाहुणे प्रा.फ.म.शहाजिंदे सर ज्येष्ठ साहित्यिक,मोईजभाई शेख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे लातूर, केंद्रीय अध्यक्ष ॲड.हाशम पटेल, संस्थापक कवी, लेखक श्री.शफी बोल्डेकर सर, संस्था उपाध्यक्ष युवा कवी खाजाभाई बागवान, पहिल्या संमेलनाध्यक्षा कवयित्री अनीसा सिकंदर शेख, डॉ.ई.जा.तांबोळी, डॉ.एहसानुल्ला कादरी, ज्येष्ठ कवी जाफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
चंद्रपूरचे कवी एम.ए.रहीम (बंदी) यांना ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था संपादित “इखलाख” या रमजान विशेषांकात उत्कृष्ट अभंग रचनेला प्रथम पुरस्कार पहिल्या संमेलनाध्यक्षा व संपादक अनीसा सिकंदर शेख, लातूर जिल्हा अध्यक्षा तहेसीन सय्यद साहित्यिका, तसेच प्रसिद्ध गझलकारा निलोफर फनीबंद यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
“स्पंदन” या स्मरणिकेचे व संमेलनाध्यक्षा मलेका शेख लिखित “अक्षर अक्षर शिकूया” या बालकवीता संग्रहाचे प्रकाशन झाले.उद्घाटन सत्रात तिन गुणीजनांचा सत्कार करण्यात आला.मा.नुरजहाॅ शेख सोलापूर, ॲड.फरहीन खान उमरगा, कवी गौसपाशा शेख पालघर, तसेच दहा फातिमाबिच्या लेकीना युगस्त्री फातिमाबि शेख सन्मानार्थी-२०२५ पुरस्कार देण्यात आला.उद्घाटनांचे सुत्रसंचलन कवयित्री नसीम जमादार यांनी केले.