आपण सर्वांना ज्ञात आहे की, आजच्या स्वार्थी जगात कुणी कुणाला मदत करत नाही. त्यामुळे कुणाकडूनही कोणत्याही गोष्टीची अपेक्षाही करता येत नाही. माणसाच्या याच बदलांमुळे निसर्ग व अन्य भौगोलिक परिस्थितीमध्ये बदल पडत आहे. अवेळी पाऊस व व्हायरस सारख्या अनेक गोष्टी मानवाच्या या बदलांवर अटॅक करत आहे. जेणेकरून मानवाला याची जाणीव व्हावी नि आपल्या आचरणात बदल करून स्वार्थपणा सोडावा. परंतु मानवाच्या वृत्तीत काहीच फरक पडताना दिसत नाही. याही परिस्थितीत काही अंशी लोकांमध्ये आजही मानुसकी जीवंत आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील सर्वांचे लाडके नेतृत्व आकाशभाऊ आत्राम. हलाकीच्या परिस्थितीत आपलं जीवन व्यतीत करत असतानाही चांगल्या लोकांना लाजवेल असं कार्य ते करत आहे.
अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे प्रत्येक परिस्थिती त्यांनी जवळून अनुभवली आहे. यामुळे साहजीकच त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. याच जाणीवेपोटी आपल्यावरून इतरांचा विचार करणारे लाडके व्यक्तीमत्त्व म्हणून परिसरात त्यांची ओळख आहे. याशिवाय शिवाजीराव मोघे साहेबांचे खंभीर नेतृत्त्व म्हणूनही सर्वत्र परिचित आहे. त्यांनी परिसरातील जनतेच्या प्रत्येक क्षेत्रातील समस्या शासन दरबारी मांडून अनेक समस्या निकाली काढले आहेत. अनेक लोकांना विविध गोष्टींचा लाभ व न्याय मिळवून दिला आहे. सामाजिक क्षेत्रातील कोणत्याही कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.
विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड देत वाटचाल करावी लागते. हे आपणास वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांना विद्या ग्रहण करण्यास कसल्याही प्रकारे अडचण निर्माण होवू नये व त्यात कोणत्याही कारणाने खंड पडू नयेत. म्हणून याकडे बारकाईने लक्ष देऊन परीसरातील विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. वसतीगृह, स्कॉलरशिप, पाठ्यपुस्तके यासारखे अनेक प्रश्न त्यांनी मुळासकट उपटून काढण्याचा प्रयत्न केले आहेत. त्यांना येणे-जाणे करण्यासाठी जवळपासच्या विद्यार्थ्यांना सायकली मिळवून दिलेत व दुरच्या विद्यार्थ्यांना महामंडळाकडे निवेदन देऊन बसची व्यवस्था करून दिले. विद्यार्थी हिताच्या ज्या-ज्या गोष्टी करता येईल, त्या-त्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत.
शेतक-यांच्या अनेक अडचणी व समस्या शासनाच्या निदर्शनास आणून ते सोडवण्यात पण त्यांनी यशस्वी झाले. अनेक शेतक-यांना शेतीपयोगी साहित्य व इतर योजना त्यांनी मिळवून दिल्यात. तसेच शतक-यांसोबतच अनेक गावातील पाणी समस्या अगदी नियोजनबध्द पद्धतीने कशा सोडवता येईल? याकडे लक्ष देऊन ते काटेकोरपणे हाताळण्याचे मार्गदर्शन देऊन मिटविले आहे. जिथे हातपंपाची आवश्यकता असेल तिथे हातपंपाची व्यवस्था करून दिलेत. म्हणजे जिथे ज्या पद्धतीने तो प्रश्न सोडवता येईल, त्या पद्धतीने तो सोडवला आहे. एकंदरीत पाणी प्रश्न मिटवण्याचा पुरेपुर प्रयत्न त्यांनी केला आहेत.
अनेक गावातील निराश्रीत व गरजू लोकांना घरकुलचा लाभ मिळवून देण्यात सतत प्रयत्नशील राहून ते मिळवून देण्यात पण ते नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत. सोबतच गावातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रस्ता. पांदनरस्त्यापासून ते गावातील मुख्य रस्ते त्यांच्यामुळेच आज रोजी पक्के व सुस्थितीत झालेले आहे. याशिवाय परिसरातील अनेक दैनंदिन गरजेच्या समस्या त्यांनी शासनापुढे मांडून त्या निकाली काढण्यास सदैव प्रयत्न केलेत आणि करत आहे. ज्या समस्यांकडे शासन दुर्लक्ष केलेत, तेव्हा त्यासाठी लढा उभारून, आंदोलन करून त्या समस्या सोडवण्यास शासनाला भाग पाडले आहेत. असे हे परिसरातील लाडके नेतृत्व सामान्य जनतेचे कैवारी बनले आहेत. त्यांचा हा अविरत कार्यप्रवास असाच फलदायी राहो, याच प्रार्थनासह त्यांच्या कार्याला सलाम करीत त्यांना भावी वाटचालीकरीता अगणित हार्दिक शुभेच्छा..!
- शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
- कमळवेल्ली, यवतमाळ
- भ्रमणध्वनी-7057185479