आम्ही गुढीपाडवा मनवतो.पण सर्वच जण मनवत नाही.विशिष्ट धर्माचा म्हणून सोडून देतो.खरंच गुढीपाडवा हा विशिष्ट धर्माचा सण आहे का?याची शहानिशा आपण करीत नाही केलेलीही नाही.पुर्वी गुढी म्हणुन काठीची पुजा होत असे.या काठीलाच गुढी म्हणत.या काठीची पुजा होत असे.पुढे या काठीपुजेला सणाचे महत्व प्राप्त झाले.इव्हाल्युशन आफ गाड या ग्रंथात ग्रेट अँलनने काठीपुजेचे महत्व सांगितलेले आहे.त्यांनी त्यासाठी सायबेरीया व दक्षिण अफ्रीकेतील सामोयीड्स व दामारा जमातीचा अभ्यास केला.याच काठीपुजेची पुजा इस्रायलमध्ये अशेराह पोल,युरोपात नार्वेजियातील meare चर्चमध्ये,तसेच मेपोल येथील पँसाफीकच्या माओरी भागात व्हाकापोकोको आतुआ या आदिवासी जमातीत करत होते.तसेच कुक बेटावर आदिवासी आतुआ राकाऊ,चीनमध्ये मिआओ, अनसूनमध्ये येलांग संस्कृती,व्हिएटनाममध्ये केन्यु, कोरीयामध्ये जाँगशाँग सोटडे,म्यानमारमध्ये के होते बो,अमेरिकेत देवकस्तंभ इथेही पुजा होतच होती.
भारतीय उपखंडात नेपाळ,आसाम, त्रिपुरा,मणिपुर,बलुचिस्तान मध्ये काठीची पुजा होत होती.भारतात तर यात्रा निघते.मोठ्या प्रमाणात काठीला आणि देवीला सजवले जाते बलुचिस्तान जे आता पाकिस्तान मध्ये आहे तिथे हिंगलाज देवीच्या रुपाने पुजा व्हायची.मध्यप्रदेश मध्ये निमांड प्रांतात,महाराष्ट्रात जतरकाठी,काठीकवाडी,नंदीध्वज ,राजस्थान मध्ये भोगाजी मंदीर,ओरीसात खंबेश्वरी या ठिकाणी मोठी यात्रा भरायची. ही पुजा का करायचे त्याचीही काही कारणे आहेत.
- १)येशु ख्रीस्ताला सुळावर चढवितांना लाकडी ठोकळ्याचा वापर केला गेला. म्हणून युरोपात लाकडी काठीचे पुजा केली जाते.
- २)इंद्राने प्रसन्न होवून उपरिचर राजाला लाकडी काठी दिली.तिची राजा उपरिचर आदरातिथ्य म्हणून पुजा करायचा.ती प्रथा भगवान क्रिष्णाने तोडली व गोवर्धन पर्वताची पुजा करायला लोकांना बाध्य केले.
- ३)प्रभु श्रीराम याच दिवशी अयोध्येत परत आले म्हणुन चौदा वर्ष वह वनवासातून परत आल्यामुळे पुजा होवू लागली.
- ४)ब्रम्हदेवाने याच दिवशी सृष्टी बनविणे सुरु केले.
- ५)शालीवाहन नावाच्या कुंभाराने शकाचा परीभव केला.त्या दिवशीपासून शालीवाहन शक सुरु झाले.
- ६)याच दिवशी १६८९ मध्ये संभाजीला शहीद केले गेले.
या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करुन गुढी उभारुन घराला तोरणे पताका लावून पुजा केली जाते.गुढीला आंब्याची पाने,कडूनिंबाची पाने,लाल कापड,उपडा कलश,रेशमी वस्र,फुलाचा हार,गाठी अर्पित केलं जातं.तो बास खाली जमीनीवर पाटावर ठेवून त्याखाली रांगोळी टाकून,रांगेळीपुर्वी जागा स्वच्छ करुन वा शेणाने सारवून ऊभारला जातो.या बासाला गंध,अक्षता,फुले वाहिली जातात.निरांजन धुप अगरबत्ती लावली जाते.पेढ्याचा नैवेद्य चढविला जातो.जेवणात ओवा,हिंग,तसेच सकाळी हिंग ओवा,सैधव मीठ,मिरी पावडर,कडूनिंबाच्या पाल्यासोबत चगळून खाल्ला जातो.यामुळे शरीरातील पित्त,कुमीविकार,त्वचारोग,पचनक्रिया सुधार या गोष्टी घडतात.कडूनिंबाचा पाला आंघोळीत टाकून आंघोळ केली जाते.महत्वाची गोष्ट ही की गुढीपाडवा हे नवसंजीवन आहे.
या गुढीपाडव्यावर काही कवींनी कवने रचली आहेत.१२४८ मध्ये म्हाईभटांनी लीळाचरित्रात,ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत ४,५,१४ व्या अध्यायात गुढीपाडव्याचे महत्व सांगीतले आहे.संत नामदेव,संत एकनाथ,संत जनाबाई,संत विष्णुदास,बहिणाबाई यांनीही यावर आपली कवने केली आहेत.संत चोखोबा म्हणतात.
- टाळी वाजवावी
- गुढी उभारावी।
- वाट हे चालावी
- पंढरीची. ।।
एवढं पुजेचं महत्व आहे.पण या उत्सवाला एक ग्रहणही लागलं आहे.ते ग्रहन म्हणजे संभाजीची हत्या.लोकांनी गुढीपाडवा साजरा करु नये म्हणून औरंगजेबाने अत्यंत निर्घुनपणे संभाजीची हत्या केली. काही लोकं मानतात की संभाजीची हत्या झाली म्हणुन हा उत्सव साजरा करु नये.पण जर की ही उत्सव साजरा केला नसता तर साहजिकच औरंगजेबाचा विजय झाला असता व त्यांचा हेतू साजरा झाला असता.म्हणुन तद्नंतरही येथील हिंदूच नाही तर मुस्लीमांनीही हा सण हिंदुचा न मानता त्यावेळी गुढीपाडवा साजरा केला होता.ही मोगल साम्राज्याला येथील रहिवास्यांनी दिलेली एक चपराकच होती.
छत्रपतीच्या सैन्यात सर्वच होते.हिंदू मुसलमान.त्यांच्याच भेदभाव नव्हताच.पुर्वी काठी पुजा व्हायची.पण आता गुढीपुजा होवु लागली.मयतीमध्ये वापरतात तो बास,कडूनिंबाचा पाला,आंब्याची पानं उपडा कलश आता वापरला जावू लागला.पुर्वी कोणताही ध्वज वापरला जायचा.आता औरंगानं रक्त सांडवलं.म्हणुन भगवा ध्वज वापरला जावू लागला.खरंच त्या लोकांनी बलिदान दिलं आपल्यासाठी भेदभाव न करता……आम्ही काय करतो?त्यांच्या नावावर राजकारण……त्यांचं बलिदान न विचारात घेता नावे ठेवतो.छत्रपतींना तर एकाच जातीचं धर्माचं बनवतो.काय छत्रपतीच्या सैन्यात इतर जातीचे नव्हते.जीवा महाला,मदारी मेहतर,हिरोजी फर्जद हे काय शिवरायांच्याच जातीचे होते काय?ज्या चांभारांनी स्वराज्याला मदत केली.त्या चांभारांची समाधी रायगडाच्या पायथ्याशी आहे.ती का बरे बांधली असावी?याचा विचार न करता आम्ही मोबाइल मध्ये गुंततो.टिव्ही पाहतो.भडकतो.
निर्मात्यांनी बनवलेल्या सीरीयला मनोरंजन म्हणून किंवा बोध म्हणून न घेता त्यानुसार वागतो व आपला संसार तोडतो.सीरीयलमध्ये एका पत्नीचे अनेक संबंध,एका पुरुषांचे अनेक संबंध…..मग कोर्ट कचे-या.ते पाहून आपला संसार तोडणारे या देशात काही कमी नाही.खरंच आमच्या देशातील हे सण उत्सव आपले आरोग्यच नाही तर आपल्या आपली संस्कृतीही कशी होती याची जाण करुन देतात.तरीही काही मंडळी सुधरत नाही. कामावरुन थकून येणा-या पतीला जेवण न देता,मोबाइल मध्ये गर्क राहणारी महिला……बिचा-याला स्वहाताने जेवण घ्यावच लागतं.नव्हे तर कधीकधी स्वयपाकंही…..मुलेही गेम खेळत असतात मोबाइल वर.पण त्यांचा साधा अभ्यास या घरी असणा-या भगीनी घेत नाही.पुरुषही त्याच जातीचे.
आम्ही गुढीपाडवा साजरा करायलाच हवा.सर्वांनी.त्याला हिंदूचा सण न मानता.बाबर तर परकिय होता.त्यापुर्वीच या देशात मुस्लीमही स्थिरावले होते.काठी लावणे ही प्रत्येक राज्यांची परंपरा राहीलेली आहे.पुढे त्याला ध्वज आला.प्रत्येक राज्याचा वेगळ्या रंगाचा ध्वज.हा ध्वज जेव्हा जेव्हा विजय प्राप्त व्हायचा.तेव्हा तेव्हा उभारला जायचा.पुजन व्हायचं.पण आता त्याला गुढीपाडव्यासारखा विशिष्ट्य दिवस आलेला आहे.जेव्हा जेव्हा आनंद होत असेल,तेव्हा तेव्हा गुढी उभारली जायची.
आज छत्रपती संभाजी संभाजींना तुम्ही मानत नसले तरी चालेल.पण त्यांच्या विदवत्तेची कदर करायलाच हवी.औरंगाला दोष न देता आमचे पुर्वज त्यावेळी कसे वागले हे ध्यानात घ्यायला हवं.त्याच्या बदल्याची भावना न ठेवता आपण ती चूक आजतरी करणार नाही हा विडा उचलायला हवा.फितुरी, निंदा,मत्सर ह्या गोष्टी ब-या नसून त्या आपल्या जीवनाला घातक आहेत हे लक्षात घ्यायला हवं आणि सुधरायला हवं.आपली पिढीही आपण सुधरंवायला हवी.त्याशिवाय संभाजींच्या आत्म्याला शांती लाभणार नाही.गुढीपाडवा साजरा केल्याचं चीजही होणार नाही.हे आतातरी लक्षात ठेवावे.केवळ मोबाइल मध्ये गुरफटून राहू नये.
- -अंकुश शिंगाडे
- ९३७३३५९४५९