पुणे : पुढच्या शुक्रवारी आढावा घेऊन लॉकडाऊन बाबत निर्णय घेण्यात येईल, जर संख्या कमी झाली नाही तर नाइलाजास्तव लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाय योजनांची माहिती दिली.
येत्या १ एप्रिलपासून पुण्यातील सर्व खासगी कार्यक्रम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच ५0 पेक्षा अधिक संख्या लग्नाला उपस्थित नको, असे आवाहन करण्यात आले आहे.
२0 लोकांमध्ये अंतविधी करावेत. शाळा महाविद्यालय ३१ एप्रिल पयर्ंत बंद राहणार. संध्याकाळी सर्व बाग बंद राहणार. जम्बो कोव्हिडमधील सुविधा वाढवण्याचा निर्णय.पिंपरीचे जम्बो कोव्हिड सेंटर सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. ससून रुग्णालयातील बेडची संख्या ३00 वरून ५00 बेडपयर्ंत वाढवणार. बोर्डाच्या परीक्षा मात्र ठरल्याप्रमाणेच होणार आहेत. सामूहिक होळी साजरी न करण्याचे आवाहन. संख्या कमी झाली नाही तर पुढच्या बैठकीत हॉटेल बंद करावे लागतील. जिथे कोरोनाबधितांची संख्या जास्त आहे तिथे जास्त लसीचे डोस द्यायला पाहिजेत, अशी मागणी अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे.
Contents
hide
Related Stories
December 3, 2024