नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेत आतापयर्ंत ७७६ डॉक्टरांचा मृत्यू (ऊीं३ँ) झाला आहे. बिहारमध्ये डॉक्टरांच्या मृत्युंची सर्वाधिक संख्या नोंदवण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या तडाख्यात बिहारमध्ये ११५ डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७४८ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा उद्रेक सर्वाधिक होता. तरीही डॉक्टरांच्या मृत्युचं सर्वाधिक प्रमाण बिहारमध्ये असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. जाहीर केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात २३ तर दिल्लीत १0९ डॉक्टरांचा मृत्यू झालाय. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये ६२, तमिळनाडूत ५0, आंध्र प्रदेशात ४0, आसाममध्ये १0, गुजरातमध्ये ३९आणि झारखंडमध्ये ३९ डॉक्टरांचा या काळात मृत्यू झाला आहे.
गर्भवती डॉक्टरांचा मृत्यू
मरण पावलेल्या डॉक्टरांमध्ये आठ गर्भवती डॉक्टरांचाही समावेश आहे. यामध्ये तमिळनाडूतील २, तेलंगणातील २, महाराष्ट्रातील १ आणि उत्तरेतील राज्यांमधून ३ गर्भवती डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.