- अंग जर्जर व्याधीने
- मनी विकार दडले ।
- तुझ्या जीवनी मानवा
- कुठे सत्कर्म घडले? ।।
- खात होता मांस,मच्छी
- अंगी भूतदया नाही ।
- तुझे नयन आताही
- कामवासनेत राही ।।
- देशामध्ये राहूनही
- केली नाही देशसेवा ।
- कर्माविना सांग वेड्या
- कोण मिळवेल मेवा ।।
- कष्टाविना खाणाऱ्यास
- अन्न कसे पचणार? ।
- रोज आयते खाणारे
- सडकीने धावणार ।।
- पोट फुगणार ऐसे
- जणू गर्भवती बाई ।
- तुझ्या वक्र दृष्टीमुळे
- नाही सुरक्षित ताई ।।
- जसे करशील तसे
- फळ नक्कीच मिळेल ।
- कर्म अयोग्य राहता
- काळ तुजला गिळेल ।।
- विकारास पळवून
- देशासाठी कर काही ।
- तुझी किर्ती मज आता
- ऐकायची दिशादाही ।।
- शब्दसखा
- अजय रमेश चव्हाण
- तरनोळी
- ता.दारव्हा,जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७