शेंदुर्जना बाजार/स्वाती इंगळे
तिवसा येथील उच्चशिक्षित कृष्णकांत खाकसे (५१ वर्ष ) यांचे दि २२ मार्च रोजीअल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्यावर तिवसा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. तिवसा गावात सर्वाधिक उच्च शिक्षित म्हणून त्यांचा नावलौकिक होता.नेट सेट एम.फिल पी एच डी करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ते नेहमीच योग्य असे मार्गदर्शन करीत असत.म्हणूनच अनेक विद्यार्थी त्यांच्या कायम ऋणात आहे त्यांच्या अचानक जाण्याने एक आदर्श अन मनमिळाऊ मार्गदर्शक हरविला आहे अश्या प्रतिक्रिया अनेक विद्यार्थी व मान्यवर व्यक्तीनी व्यक्त केल्या आहे.