- *आ.सौ. सुलभाताई खोडके यांची शोक संवेदना व श्रद्धांजली
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे आकस्मिक निधनाबद्दल आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ तसेच शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून एक अभ्यासू, चिकित्सक दृष्टिकोन तसेच समाजाभिमुख व्यक्तिमत्वाला आपण सर्व मुकलो असल्याची शोक संवेदना आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. दिलीप मालखेडे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक होतें. सप्टेंबर २०२१ पासून त्यांनी अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यांच्यासोबत करार केला होता. नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकता यावे याकरिता त्यांनी अमरावती विद्यापीठात क्रेडिट बेस्ट चॉईस सिस्टीम सुद्धा लागू केली होती. त्यांच्या दुःखद निधनाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. या दुःखद प्रसंगी आपण शोकाकुल मालखेडे परिवाराच्या सोबत असून अमरावती विधासभा मतदार संघातील सर्व नागरिकांच्या वतीने आपण स्मुतीशेष डॉ. दिलीप मालखेडे यांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याची शोक संवेदना आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केली आहे.
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–