- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राज्य प्रशिक्षण धोरण आणि वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अमरावती विभागीय माहिती कार्यालयाच्या अधिनस्त पाचही जिल्हा माहिती कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच लेखा प्रशिक्षण घेण्यात आले. सहसंचालक लेखा व कोषागारे कार्यालयामार्फत हे प्रशिक्षण जिल्हा प्रशिक्षण संस्थेत झाले. त्यात सुमारे 25 कर्मचारी सहभागी झाले होते.
विभागीय आयुक्त कार्यालयातील लेखाधिकारी रवींद्र जोगी तसेच सहायक लेखाधिकारी प्रिती वाकोडे यांनी प्रशासनाच्या सेवाविषयक बाबी, आस्थापना व लेखाशाखा याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षकांनी कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कामातील अडचणी जाणून घेऊन त्यांच्या शंकांचे निराकरण केले. प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार यांनी यावेळी प्रास्ताविकातून प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांची माहिती दिली. सहायक संचालक अपर्णा यावलकर यांनी आभार मानले.
संस्थेच्या प्राचार्य तथा उपसंचालक शिल्पा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व कोर्स समन्वयक राजेश्वरी देशपांडे, लेखाधिकारी रवींद्र वानखडे, वरिष्ठ लिपीक आशिष पेटकर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला.