- दहा वर्ष कालावधी झालेल्यांना पाच हजार वाढ
मुंबई : एसटी कर्मचार्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन हे नवीन वेतनवाढीनुसार देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.नवनियुक्त ते दहा वर्ष कालावधी झालेल्या कर्मचार्यांना पाच हजार रुपये वाढ मिळणार आहे वेतन हे दर महिन्याच्या सात तारखेला होते. जे कर्मचारी कर्तव्यावर आहेत, वेतनवाढ मिळेल.
महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात सुधारित वेतनवाढीनुसार नव्याने नियुक्ती मिळालेल्या आणि १0 वर्षांच्या कर्मचार्यांना ५ हजार रुपयांची वाढ केली आहे. १0 ते २0 वर्षांपर्यंतची सेवा झालेल्या कर्मचार्यांना ४,000 रुपयांची पगारवाढ, तसेच २0 वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचार्यांना २ हजार ५00 रुपये पगारवाढ दिल्याचे नमूद केले आहे. याशिवाय २८ टक्के महागाई भत्ताही देण्यात येणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संप सुरूच आहे.
महामंडळात बुधवारी ९२ हजार २६६ पैकी फक्त १८ हजार ६९४ कर्मचारी कामावर हजर राहिले.महामंडळाने कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली आहे. एकूण निलंबित कर्मचार्यांची संख्या ८ हजार ६४३ झाली आहे. तसेच रोजंदारीवरील ६५ कर्मचार्यांची सेवा समाप्त झाली.