- होऊ नकोस कधी तू
- कार्यकर्ता उपाशी ठेवून पोट
- खरेदी करून घेतील तुला
- देऊन पाचशे हजाराची नोट
- तुझे सिद्धांत तुझे विचार
- कसे धरतील उपाशीपोटी तग
- कारण खूपच धूर्त आहे
- हे सारे आजूबाजूचे जग.
- कमकुवत पाहून तुला
- चिरडून टाकतील पायदळी
- नाहक मित्रा तू मग
- जाशील यांच्या बळी.
- कार्यकर्ता हो तू नक्की
- पण अगोदर कर उदरभरण
- कारण खूपच घाणेरडे आहे
- आपल्या देशाचे राजकारण
- पोटापाण्याचा प्रश्न सोडव तू
- मिळवून रोजगार नोकरी ठोक
- नाहीतर तुला मग म्हणतील
- रिकामटेकडा सारेच लोक
- शिकून तू चांगले इथे अगोदर
- मिळवून दाखव नोकरी भक्कम
- मग राजकारणात येऊन तू
- खर्च कर स्वतःची रक्कम
- उपाशीपोटी कार्य करशील तर
- राहशील केवळ तू एकलकोंडा
- विनाकारण कार्यकर्ता होऊन
- पाडू नकोस पायावर धोंडा
- गणेश रामदास निकम
- चाळीसगाव*गणेशपूर
- मो.न.७०५७९०४६७७, ९८३४३६१३६४