- आज आहे जरी । उद्या असणार ।
- नाही मरणार । कुणा ठाव? ।।
- आयुष्याची दोरी । नाही दिसणार ।
- आहे तुटणार । अचानक ।।
- म्हणून जगणे । विचार करून ।
- आनंदे भरून । लोकांसाठी ।।
- जिवंत राहून । नाही मरायचे ।
- आहे जगायचे । मरूनही ।।
- जन्म झाला तर । जगुनच घ्यावे ।
- कशाला मरावे । आत्मघाती? ।।
- दुःख आज जरी । समोर दिसेल ।
- उद्याही असेल । शक्य नाही ।।
- संयमीत रहा । भटकणे सोडा ।
- माणसाला जोडा । स्वबळाने ।।
- प्रेम देणाऱ्याला । प्रेमच मिळेल ।
- विकार जळेल । आपोआप ।।
- अजु म्हणे तुम्हा । भेद विसरूया ।
- आयुष्य वाहूया । सत्कार्यात ।।
- शब्दसखा-
- अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७