मोर्शी : आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपल्या जबाबदारीचे भान ठेवत आमदार देवेंद्र भुयार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई येथील भायखळा मसिना हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्त दात्यांनी रक्तदान करून रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान या उक्तीनुसार रक्तदानाचे महत्व समाजासमोर ठेवले. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांचे स्वीय सहाय्यक शैलेश भुयार, रुग्ण सेवक पंकज ठाकरे, ॲड. रमेश लासकर, अक्षय सायखडे, प्रसाड ऊकिर्डे, कपिल जगताप, समाजसेवक चारुदत्त वैद्य यांच्यासह आदींनी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदान केले.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करतात यावेळी मुंबई येथे रक्तदान करून या उपक्रमात सहभागी होऊन या युवकांनी रक्तदान केले त्याचबरोबर वृक्षतोडीमुळे ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून सहभाग घ्यावा असे आवाहन शैलेश भुयार यांनी केले वाढदिवसानिमित्त पार्टी करण्यापेक्षा असे समाजोपयोगी उपक्रम राबवायला हवेत असे वाटत असल्याने वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करीत असल्याचे शैलेश भुयार यांनी सांगितले .