- * कॅमेराचा केला नेत्रदिपक सन्मान
- * अंबानगरी फोटो-व्हिडिओ ग्राफर्स असो.ने काढली भव्य दिंडी
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : आमचे दैवत, आमचा देव्हारा सर्व काही आमचा कॅमेरा म्हणत 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनाच्या पर्वावर शहर-जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी कॅमेराचा नेत्रदिपक सन्मान केला. अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर असोसिएशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कॅमेरा दिंडी काढली.
या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितिन कदम, अॅड. प्रशांत देशपांडे, माजी नगरसेवक संजय शिरभाते यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीत ठेवलेल्या कॅमेराचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अंबानगरी फोटो व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप जिरापुरे, सचिव प्रतिक रोहनकर यांच्यासह अन्य पदाधिका:यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच या मान्यवरांनी फोटोग्राफी क्षेत्राशी निगडित असलेल्या व्यक्तींचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. अंबानगरी फोटो-व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशनवर गाणे रचण्याची संकल्पना मांडत ते स्वामीनी तायडे व दिनकर तायडे यांनी वास्तवात आणली. त्या गाण्याचेही मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
- *आकर्षक ठरली दिंडी
यावेळी उपस्थित सर्व छायाचित्रकारांनी कुर्ता-पयजामा व त्यावर विविध रंगाचे फेटे परिधान केल्याने दिंडीला एक वेगळीच शोभा आली होती. दिंडीला अंबागेट येथुन सुरूवात झाली. जय फोटो स्टुडिओ येथे पालखीचे दलाल कुटूंबियांनी पुजन केले. दमलेल्या छायाचित्रकांरांकरिता सबनीस स्टुडिओच्या वतीने या मार्गावर शरबत व आईस्क्रीम व्यवस्था करण्यात आली होती. वारकरी दिंडी, ढोल पथक, डिजे या दिंडीचे विशेष आकर्षण होते. यावेळी छायाचित्रकार डिजेच्या तालावर मनमुराद थिरकले.
- *अनेक मान्यवरांनी दिल्या भेटी
अमरावती जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातुन छायाचित्रकार उपस्थित दिंडीत पाहण्यात आली. राजकमल चौकात लायन्स क्लबच्यावतीने पालखी वर पुष्पवृष्टी करण्यात आली. आमदार सुलाभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत डवरे, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ.नितिन धांडे, जयंत डेहनकर, शिवराय कुलकर्णी, शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. मार्गात जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर दिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी आपली उपस्थिती राखली होती. सुधीर कहाते, वामनराव वैद्य, सुनील सोलंकी, लिलाधर इंगळे, रीतेश हातागडे, टिकुभाई सोंलकी, ज्ञानेश्वर मेश्राम, दत्तात्रेय बनारसे, संजय खांडेकर, वामनराव बाळापुरे, सावळाराम तडस यांच्यासह अंबानगरी फोटो व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.