यवतमाळ : गत २४ तासात जिल्ह्यात आठ मृत्युसह ४२५ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ३८0 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ५२ व ६२ वर्षीय पुरुष आणि ५६ व ७६ वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील ६0 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ७६ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ५0 वर्षीय महिला आणि तालुक्यातील ८0 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या ४२५ जणांमध्ये २९0 पुरुष आणि १३५ महिला आहेत. यात यवतमाळ येथील १६0 जण पॉझेटिव्ह, उमरखेड ६९, पांढरकवडा २९, आर्णि २३, पुसद २२, नेर २१, दिग्रस १७, वणी १६, घाटंजी १४, बाभुळगाव ११, महागाव ११, राळेगाव ८, मारेगाव ७, झरीजामणी ७, दारव्हा ५, कळंब ३ आणि इतर शहरातील ३ रुग्ण आहे.
रविवारी एकूण ४0६९ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ४२५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर ३६४४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१७३ अँक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती १४६३ तर गृह विलगीकरणात १७१0 रुग्ण आहेत. तसेच आतापयर्ंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ३0६५१ झाली आहे. २४ तासात ३२५ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या २६७९४ आहे. तर जिल्ह्यात एकूण ६८४ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर १0.७५ असून मृत्युदर २.२३ आहे. सुरवातीपासून आतापयर्ंत २८५१६0 नमुने पाठविले असून यापैकी २८३0५0 प्राप्त तर २११0 अप्राप्त आहेत. तसेच २५२३९९ नागरिकांचे नमुने आतापयर्ंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.