- * शब्दास्त्र विचार मंच, बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्टचे आयोजन
- गौरव प्रकाशन न्यूज नेटवर्क
अमरावती (प्रतिनिधी) : शब्दास्त्र विचार मंच, बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने पहिले परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन रविवार २९ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीम टेकडी परिसर येथे आयोजित करण्यात आले आहे.रविवार २९ मे रोजी सकाळी १० वाजता या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यीक शिवा इंगोले यांच्या हस्ते होणार आहे.
संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यीक रमेश जिवने असून, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ गोपीचंद मेश्राम राहणार आहेत. उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून साहीत्यिक तुळसा डोंगरे यांच्यासह रमेशचंद्र कांबळे, प्रवीण कांबळे, डॉ नंदकिशोर दामोधरे, भीमराव वैद्य, पदमाकर मांडवधरे, चरणदास नंदागवळी, देवानंद पाटील, अविनाश गोंडाणे, देवीलाल रौराळे आदि साहीत्यिक, विचारवंत मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. दुपारी १२ वाजता “आमचा सत्कार, आमच्या आठवणी” हा हृदयस्पर्शी कार्यक्रम होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. सीमा मोरे तर सत्कारमुर्तीमध्ये रमेशचंद्र कांबळे, संगीता ठलाल , भीमराव वैद्य, प्रेमानंद तिडके, रणजीत चव्हाण, संजय खडसे, स्नेहल वानखडे, ललिता घोडस्वार, डॉ. अजय मेश्राम, पुंजाराम ठवरे, हे उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता “आजचे आंबेडकरी साहित्य प्रचारकी झाले काय?, शोध आणि बोध ” या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये अध्यक्षस्थानी डॉ अनंता सूर तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ नरेश इंगळे, भाग्यश्री गाडगे, प्रा पंचशील नकाशे, प्रा हंसराज रंगारी हे सहभागी होणार आहेत.
तिसऱ्या सत्रामध्ये दुपारी ४ वाजता निमंत्रीतांचे कवीसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी रमेशचंद्र कांबळे राहणार असून, सहभागी होणाऱ्या कवींमध्ये शिवा इंगोले, नंदकिशोर दामोधरे, सुजाता पुरी, अंजली वनकर, पदमाकर मांडवधरे, संगीता ठलाल, दिगंबर झाडे, प्रणोती शेंडे, प्रविण कांबळे, पायल भुसाटे, देवीलाल रौराळे, रेखा राऊत, देवानंद पाटील, अमृता मनोहर, अविनाश गोंडाने, प्रशांत खैरे, राजेंद्र भटकर, सुकेशीनी घरडे आदींचा समावेश असणार आहे.
संध्याकाळी ७ वाजता प्रसिद्ध लेखक सुधील कांबळे लिखीत “क्रांती प्रतिक्रांती” हे परिवर्तनवादी नाटय, प्रख्यात नाटककार तथा आंबेडकरी साहीत्यिक विलास थोरात, सिद्धार्थ गोंडाणे, नकुल नाईक आदी सादर करणार आहेत. तर रात्री ८ वाजता डॉ नंदकिशोर दामोधरे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार असून, यावेळी प्रामुख्याने दिगंबर झाडे, पदमाकर मांडवधरे, अमृता मनोहरे, देवानंद पाटील, अविनाश गोंडाणे, देविलाल रौराळे हे उपस्थित राहतील. तरी या साहित्य संमेलनात वाचक ,विचारवंत, साहीत्यप्रेमींसह नागरीकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन, बॅरीष्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरीयल ट्रस्टचे रमेशचंद्र कांबळे, शब्दास्त्र विचार मंचचे प्रमुख प्रविण कांबळे, आयोजन समितीतील प्रा.पंचशील नकाशे, भगवान गजभिये, सुकेशनी घरडे, मंगला मेश्राम, अॅड.दीलीप घरडे, सुशांत मेश्राम,अनिल पाटील आदिंनी केले आहे.